संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर- ‘अहमदनगर बार असोसिएशन’च्या एकूण ८ पदासाठी शुक्रवारी ( दि. 29 ) होत असणा-या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारांच्या अर्जांची छाननी शुक्रवारी (दि.२२) झाली. या छाननीनंतर असोसिएशनच्या निवडणुकीतील पदनिहया उमेदवारांची नावे निवडणूक निर्णय अधिकारी ॲड अशोक यशवंतराव गुंडपाटील यांनी प्रसिद्ध केले आहे.
अहमदनगर बार असोसिएशन निवडणुकीसाठी उमेदवार याप्रमाणे अध्यक्षपदी संजय उर्फ संजू गोवर्धन पाटील, ॲड. सुधीर विष्णुपंत टोकेकर, ॲड. अनिल दिनकर सरोदे, उपाध्यक्षपदासाठी ॲड. अनुराधा दिनेश येवले, ॲड.संदीप रामदास वांडेकर, सचिवपदासाठी ॲड अनुराधा दिनेश येवले, ॲड. स्वाती शाम नगरकर, खजिनदारपदासाठी ॲड.अविनाश विलासराव बुधवंत, सहसचिवपदासाठी ॲड.अमित प्रमोद सुरपुरिया, महिला सहसचिव पदासाठी ॲड. स्वाती शाम नगरकर, ॲड.आरती नवनाथ गर्जे पाटील, कार्यकारणी सदस्यपदासाठी ॲड.सागर कृष्णा जाधव, ॲड. विक्रम भाऊसाहेब शिंदे., महिला कार्यकारणी सदस्यपदासाठी ॲड.सोनाली बाबा कचरे आदींचे उमेदवारी निवडणूक निर्णय अधिकारी अशोक यशवंतराव गुंड पाटील यांनी प्रसिद्ध केली आहे.
अहमदनगर बार असोसिएशनची निवडणूक शुक्रवार दिनांक 29 ऑक्टोबर ला नवीन न्यायालय महिला वकील कक्षेमध्ये सकाळी 8 30 ते चार तीस या वेळेत मतदान होणार आहे त्याच दिवशी सायंकाळी पाच वाजेनंतर मतमोजणी होऊन लगेच निकाल जाहीर केला जाणार आहे.