संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर- पोलीस भरती-2021 मधील अहमदनगर जिल्हा पोलीस दलातील पदे भरण्यासाठी (पोलीस शिपाई व चालक पोलीस शिपाई) उमेदवारांकडून आवेदन अर्ज स्विकारण्याबाबत दि. 30 नोव्हेंबर 2022 हा अंतिम दिनांक निश्चित करण्यात आला होता.
तथापि उमेदवारांना आवेदन अर्ज भरण्याबाबत येत असलेल्या तांत्रिक अडचणीच्या अनुषंगाने प्राप्त झालेल्या तक्रारींचे निराकरण व्हावे, तसेच सर्व उमेदवारांना भरती प्रक्रियेत सहभागी होता यावे. यादृष्टीकोनातून पोलिस भरती प्रक्रियेतील आवेदन अर्ज करण्यास महाराष्ट्र शासन गृहविभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील आदेश क्रमांक पोलीस-1122/प्र.क्र.22/पोल-5अ, दि. 29 नोव्हेंबर 2022 अन्वये गुरुवार दि.15 डिसेंबर 2022 रोजी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.