अहमदनगर जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

👉नगर शहरात नव्याने कोतवाली पोनि यादव, तोफखाना पोनि साळवे, भिंगार सपोनि मुंडे, एमआयडीसी सपोनि सानप, नगर तालुका सपोनि देशमुख
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर –
नगर जिल्हा पोलिस दलातील ३३ पोलिस निरीक्षक व १५ सहायक पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या जिल्हातर्गत बदल्यांचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी मंगळवारी (दि.२८) रात्री उशिरा काढले असून बुधवारी (दि.१) सकाळीच ते सर्व पोलिस अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ नियुक्तीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश देण्यात आले. यामध्ये नगर शहर परिसरातील कोतवाली, तोफखाना, भिंगार कॅम्प, नगर तालुका, एमआयडी, शहर वाहतूक शाखेला नवे अधिकारी बदलून आले आहेत.

अहमदनगर जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाची बैठक मंगळवारी (दि. २८) पार पडली. बैठकीत जिल्हास्तरीय पोलीस आस्थापना मंडळाचे अध्यक्ष, सदस्य व सदस्य सचिव उपस्थित होते. बैठकीत नमुद पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या नेमणुका करण्याविषयी सखोल चर्चा करण्यात येऊन विचार विनिमय करण्यात आला व त्याप्रमाणे त्यांचे बदल्याबाबत नेमणुकांबाबत सहानुभूतिपूर्वक विचार करून जनहितार्थ, कायदा व सुव्यवस्था प्रशासकीय निकडीनुसार व विनंतीनुसार सन २०१५ च्या महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम २२ न चे पोटकलम (१) व (२) तसेच त्याखालील सुधारित स्पष्टीकरणानुसार, तसेच सक्षम प्राधिकारी म्हणुन जिल्हा स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळ यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करन, जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाने संबंधित पोलीस अधिकारी यांच्या त्यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे मध्यावधी प्रशासकीय/ विनंती बदल्या नेमणुका करण्याबाबत सर्वानुमते निर्णय घेतला असल्याचे पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी या आदेशात म्हंटले आहे. जिल्हांतर्गत बदल्या झालेले पोलिस निरीक्षक व त्यांचे नवीन पोलिस ठाणे (कंसात सध्याचे) पुढील प्रमाणे कोतवाली पो.नि. चंद्रशेखर मोहनराव यादव (कर्जत), मधुकर धोंडोबा साळवे तोफखाना (जि.वि.शा.), ज्योती चंद्रकांत गडकरी सुपा (तोफखाना), संभाजी अभिमन्यु गायकवाड पारनेर (जामखेड), ज्ञानेश्वर भगवानराव भोसले श्रीगोंदा (सायबर पोलिस ठाणे), – विजय मारुती करे कर्जत (नेवासा) महेश विष्णु पाटील जामखेड (बदली आदेशाधीन), संजय राजाभाऊ ठगे बेलवंडी (नव्याने हजर), संतोष रामचंद्र मुटकुळे पाथर्डी (बदली आदेशाधीन), – शिवाजी अण्णा डोईफोडे नेवासा (नव्याने हजर) हर्षवर्धन गोविंद गवळी श्रीरामपूर शहर नियमीत (श्रीरामपूर शहर तात्पुरते ), दशरथ निंबा चौधरी श्रीरामपूर तालुका (बदली आदेशाधीन), मेघश्याम – दादा डांगे राहुरी (नियंत्रण कक्ष), नंदकुमार विष्णू दुधाळ शिर्डी (बदली आदेशाधीन), गुलाबराव राजाराम पाटील वाहतूक शाखा (शिर्डी पोलिस स्टेशन), रामराव त्रिंबक ढिकले कोपरगाव शहर (श्रीगोंदा), वासुदेव रामभाऊ देसले कोपरगाव तालुका – कोपरगाव शहर), भगवान हरीभाऊ मथुरे संगमनेर शहर (बदली आदेशाधीन), देवीदास किसन दुमणे संगनमनेर तालुका (बदली आदेशाधीन), संतोष बापूराव खेडकर घरगाव (नव्याने हजार), सुभाष दादा भोये अकोले (आरवी), संतोष नारायण भंडारे – आश्वी (नव्याने हजर), मोरेश्वर लक्ष्मणराव पेंदाम नगर शहर वाहतूक शाखा (जि. वि. शाखा), चंद्रकांत कृष्णा निरावडे जिल्हा – वाहतूक शाखा (नव्याने हजार), दिनेश विठ्ठलराव आहेर सायबर पोलिस ठाणे – ( नव्याने हजर) मच्छिंद्र रामचंद्र खाडे मानव संसाधन, अहमदनगर (नियंत्रण कक्ष), सुहास भाऊराव चव्हाण आर्थिक गुन्हे शाखा (पाथर्डी), अरुण राधाकिसन आव्हाड – आर्थिक गुन्हे शाखा (आर्थिक गुन्हे शाखा सह संगमनेर तालुका), धनश्याम जयवंत बळ वाचक पोलिस देशमुख तसेच दुसया अधीक्षक (पारनेर), संपत सखाराम शिंदे – जि. वि. शा. कोतवाली), राजेंद्र बापूराव भोसले जि. वि. शा. (अर्ज शाखा सह – संगमनेर शहर), राजेंद्र जगन्नाथ इंगळे साई मंदिर सुरक्षा शिर्डी (म. व बा. अ. प्र. कवा), नितीनकुमार निळकंठ गोकावे टि.एम.सी. अहमदनगर (सुपा).


👉बदल्या झालेले साहाय्यक पोलिस निरीक्षक पुढीलप्रमाणे राजेंद्र अशोक सानप एमआयडीसी (नगर तालुका), शिशीरकुमार कैलासराव देशमुख नगर तालुका (भिंगार कॅम्प), दिनकर सखाराम मुंडे भिंगार कॅम्प (स्थानिक गुन्हे शाखा), महेश ईश्वर जानकर खर्डा (श्रीगोंदा), कैलास फकीरा वाघ तोफखाना (शहर वाहतूक शाखा), समाधान सुरेश पाटील शिर्डी (लोणी), गणेश ज्ञानेश्वर इंगळे – राजूर (स्थानिक गुन्हे शाखा), माणिक भाऊसाहेब चौधरी सोनई नियमीत (सोनई तात्पुरते ), प्रकाश अधिकराव पाटील अर्ज शाखा – अहमदनगर (ख), ज्ञानेश्वर कचरू थोरात नेवासा (श्रीरामपूर – तालुका), गणेश लक्ष्मण वारुळे स्थानिक गुन्हे शाखा (हजर), राजेंद्र दशरथ पवार – संगमनेर शहर (नव्याने हजार), राजू भगवंत लोखंडे राहुरी (बदली आदेशाधीन), अरुण दत्तू मिसे वाहतूक – शाखा शिर्डी (नियंत्रण कक्ष, अ.नगर) बदली झालेल्या अधिकाऱ्यांना तात्काळ बदलीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे सकाळपासूनच पुर्वीच्या पोलिस ठाण्याचा पदभार सोडून नवीन पोलिस ठाण्यात पदभार स्विकारण्याचे काम सकाळपासूनच पोलिस अधिकाऱ्यांनी सुरू केले होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!