अहमदनगर क्राईम बुलेटिन

कोतवाली पोलिस ठाणे: सोशल मिडीयावर आक्षेपार्ह स्टेटअस ठेवणाऱ्यावर गुन्हा
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
Nagar Reporter
अहमदनगर
: व्हॉटसअपवर आक्षेपार्ह स्टेटअस ठेवून दोन समाजामध्ये द्वेष भावना भडकविणाऱ्यावर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दीपक देविदास झगरे (रा. बुरूडगाव रस्ता, अहमदनगर) हे शुक्रवारी (दि.७) सायंकाळी ६ वाजता आय.टी.आय. चौकातील ऋषी ऑटो गॅरेजवर होते. त्यावेळेस मोबाईल पाहिला असता, एका तरूणाने व्हॉटसअपला दोन समाजात द्वेष भावना निर्माण होईल, असा स्टेटअस ठेवला होता. झगरे याने कोतवाली पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी मुस्तकिया शेख याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज कचरे पुढील तपास करीत आहेत.

एमआयडीसी पोलिस ठाणे : परिसरात ११ अवैध टपऱ्यांवर छापे ; २७ हजार २५८ रुपयांचा मुद्देमाल जप्त
Nagar Reporter
अहमदनगर :
एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी शनिवारी (दि.८) एमआयडीसी येथील विखे पाटील कॉलेज नगर-मनमाड महामार्ग परिसरामध्ये गस्त घालून टपऱ्यावर सुगंधी तंबाखुची विनापरवाना विक्री करणाऱ्यांवर ११ आरोपींवर गुन्हे दाखल केले. २७ हजार २५८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
एमआयडीसी परिसरात विखे पाटील कॉलेजचे प्रवेशद्वारासमोर, सहयाद्री चौक, काकासाहेब म्हस्के कॉलेजचे जवळ नागापूर दरम्यान दुपारी बारा ते अडीच वाजण्याच्या दरम्यान आरोपी गणेश बाळासाहेब घावटे (वय ३५, रा. सोनई, ता. नेवासे, हल्ली रा. वडगाव गुप्ता), सचिन भाऊराव कोहिले (वय २५, रा. गजानन कॉलनी, नवनागापूर, शुभम दत्तात्रय हजारे (वय २२, रा. केडगाव), गणेश अण्णा शिंदे (वय २०, रा. सावेडी), लखन नानासाहेब कर्जुले (वय २७, रा. तामसवाडी, ता. नेवासे), मनोज यशवंत कागुणे (वय ३५, रा. गजानन कॉलनी, नवनागापूर), पंकज किशोर आकडकर (वय ३६, रा. गजानन कॉलनी, नवनागापूर, धनराज अनिल मासुळे (वय २५, रा. नवनागापूर), गणेश प्रकाश निमसे (वय१९, रा. अरुण हॉटेलमागे, नागापूर), विजय उर्फ भोल्यासिंग हरीद्र सिंग (वय २०, रा. गजानन कॉलनी, नवनागापूर), अनिकेत संजय आरडे (वय २१, रा. बोल्हेगाव) यांच्या ताब्यातून सुगंधी तंबाखू, मावा असे महाराष्ट्र राज्यात तयार करण्यास व विक्री करण्यास बंदी असलेले पदार्थ मिळून आले. त्यांच्याविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिस अंमलदार किशोर जाधव, मच्छिंद्र पांढरकर, संदीप चव्हाण, सचिन हरदास, युवराज गिरवले आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

तोफखाना पोलीस ठाणे : भिंत पाडणाऱ्या कुटुंबावर गुन्हा
Nagar Reporter
अहमदनगर
: शहरातील डाळमंडई येथे संरक्षक भिंत पाडणाऱ्या कुटुंबावर तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत खालीद मोहम्मद शेख (वय ५३, रा. मुकुंदनगर, अहमदनगर) यांनी फिर्याद दिली आहे.
राजेंद्र गिते उर्फ बाळू चुन्नेवाला हा कुटुंबासह शुक्रवारी (दि.७) दुपारी साडे बारा वाजता डाळमंडई भागात आला. त्याची मालमत्ता याच भागात आहे. त्याने मालमत्तेच्या ठिकाणी जाण्यासाठी रस्त्यातील प्रवेशद्वाराजवळील गेटची चावी मागितली. चावी मिळाल्यावर त्याने कुटुंबीयांच्या मदतीने संरक्षक भिंत हाताने आणि लोखंडी पाईपने पाडण्याचा सुरूवात केली. त्यास समजावून सांगितले असता, त्याने शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. खालीद शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात आरोपी राजेंद्र गिते, त्याची पत्नी, मुलगा, दोन मुली असे पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!