अहमदनगर क्राईम बुलेटिन

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork

पंचायत समितीचे माजी सदस्य गोविंद मोकाटेंना जामीन
अहमदनगर : महिला अत्याचार प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असणारे नगर तालुका पंचायत समितीचे माजी सदस्य गोविंद खंडू मोकाटे यांना अहमदनगर जिल्हा आणि सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. ॲड. सतीश गुगळे यांनी न्यायालयासमोर मोकाटे यांच्यावतीने काम पाहिले.
फिर्यादीच्या सा‌क्षीमध्ये असलेली विसंगती, वैद्यकीय पुरावे, त्यातले दोष, साक्षीदार महिलेच्या न्यायालयात नोंदविण्यात आलेल्या साक्षीतले गुणदोष, राजकीय वैमनस्यातून आरोपीला या गुन्ह्यात अडकवण्यात आले, सदर प्रकरणाच्या निकालाला लागणारा अनिश्चित कालावधी अशा विविध मुद्द्यांची मांडणी ॲड. गुगळे यांनी न्यायालयासमोर मांडली. न्यायालयाने हे म्हणणे ग्राह्य धरून जामीन मंजूर केला आहे. ॲड. गुगळे यांना ॲड. मंगेश देवणे, ॲड. हेमंत पोकळे, ॲड. घनश्याम घोरपडे, ॲड. चंद्रकांत भोसले, ॲड. अभिजीत गवारे, ॲड. अजित चोरमले यांनी सहकार्य केले.

सागर गायकवाड दोन वर्षांसाठी हद्दपार
Nagar Reporter
अहमदनगर :
नगर तालुक्यातील निंबळक येथील सराईत गुन्हेगार सागर दिलीप गायकवाड यास दोन वर्षाकरीता अहमदनगर जिल्ह्यातून हददपार करण्यात आले आहे. नगर-नेवासेचे उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी ही कारवाई केली.

सागर गायकवाड हा २०१९ मध्ये गुन्हेगारी क्षेत्रात आला. त्याच्यावर चोरी करणे, खुनी हल्ला करणे असे गुन्हे एमआयडीसी पोलिस ठाण्यात तीन दाखल आहेत. तसेच तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही मारमारीचा एक गुन्हा दाखल आहे. नगर ग्रामीणचे उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप, पोलिस अंमलदारर समीर सय्यद, साबीर शेख, राहुल शिंदे, राजेश राठोड, सुरज देशमुख, किशोर जाधव, सचिन हरदास यांच्या पथकाने हद्दपारीचा प्रस्ताव तयार केला होता. नगर-नेवासेचे उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी हा प्रस्ताव मंजूर केला आहे. केलेली आहे.त्याप्रमाणे आरोपी सागर गायकवाड यास शिरुर पोलिस ठाण्याच्या हददीत सोडण्यात आले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!