अहमदनगर क्राईम बुलेटिन

संग्राम सत्तेचा वापर
Online Natwork

👉अहमदनगर एलसीबी : ४ गावठी कट्टे व ८ जिवंत काडतुसे बाळगणा-या दोघांना पकडले

Nagar Reporter
श्रीरामपूर :
तालुक्यातील बेलापूर बु. येथील बाजारतळ येथे विक्री करण्याचे उद्देशाने ४ गावठी कट्टे व ८ जिवंत काडतुसे बाळगणा-या दोघा आरोपींना पकडण्यात आले. १ लाख ४५ हजार ७०० रु. किंमतीचे मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई अहमदनगर एलसीबी टिम’ने केली आहे.
एसपी राकेश ओला, श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती भोर व श्रीरामपूर डिवायएसपी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर एलसीबीचे पोनि अनिल कटके यांनी दिलेल्या सुचनेनुसार पोसई सोपान गोरे, पोहेकॉ मनोहर गोसावी, पोहेकॉ दत्तात्रय गव्हाणे, पोहेकॉ सुरेश माळी, पोहेकॉ संदिप घोडके, पोना विशाल दळवी, पोना शंकर चौधरी, पोना दिलीप शिंदे, पोना संदिप चव्हाण पोकाॅ सागर ससाणे, पोकॉ रोहित येमुल, पोकाॅं रणजित जाधव व चापोहेकॉ उमांकात गावडे, चापोहेकॉ अर्जुन बडे आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली.

मिळालेल्या माहितीनुसार एलसीबी टिम’ने वेशांतर करुन बेलापुर बु (ता. श्रीरामपूर) येथील बाजारतळ येथे जाऊन सापळा लावून थांबले. या दरम्यान रेकॉर्डवरील दत्तात्रय डहाळे व त्याच्यासोबत एकजण बेलापुर बु॥ बाजार वेशीतून बाजारतळाकडे पायी येतांना दिसला. एलसीबी टिम’ला खात्री झाल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे दत्तात्रय सुरेश डहाळे (वय ३४ रा. श्रीरामनगर, शिर्डी, ता. राहाता जि. अहमदनगर), सुलतान फत्तेमोहमद शेख (वय २९ रा. महलगल्ली, बेलापुर बु. ता. श्रीरामपुर जि. अहमदनगर) असे असल्याचे सांगितले.


त्या दोघांची अंगझडतीत १,व लाख ४५ हजार ७०० रु. किमतीचा मुद्देमाल त्यात ४ देशी बनावटीचे पिस्टल, ८ जिवंत काडतूसे असा मुद्देमाल मिळून आला. दत्तात्रय सुरेश डहाळे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी औरंगाबाद जिल्ह्यात अग्नीशस्त्रसह एक तसेच खुनाचा प्रयत्न असे दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत.
या घटनेबाबत एलसीबीचे पोहेकॉ मनोहर गोसावी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीरामपुर शहर पोलीस ठाण्यात आर्म ॲक्ट ३/२५, ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कायदेशीर कारवाई श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहे.

👉एमआयडीसी पोलीस ठाणे : ११ गोवंश वासराची सुटका, तब्बल ३ लाखांचा मुद्देमाल जप्त

Nagar Reporter
अहमदनगर :
११ गाईच्या वासरांची सुटका करून तब्बल ३ लाख ३० हजार ५०० रु.चा मुद्देमाल हस्तगत करण्याची मोठी कामगिरी एमआयडीसी पोलिसांनी केली आहे.
एसपी राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, ग्रामीण अजित पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप,पोहेकॉ दत्तात्रेय पवार, पोना राहुल शिंदे, पोकाॅ किशोर जाधव, चापोहेकॉ संदीप खैगट आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली.

दि.२५ मार्चला मिळालेल्या माहितीनुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि राजेंद्र सानप यांनी टिम’ला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. सूचनेनुसार एमआयडीसी पोलिसांनी शिंगवेगावात बेकरीच्या दुकानाजवळ नगर – मनमाड रोडवर (ता जि.अ.नगर) येथेचे दुकानाजवळ, शिंगवे गावात दुपारी १.२५ वाजण्याच्या सुमारास गेलो असता त्या ठिकाणी लोकांची गर्दी दिसली. तसेच तेथे एक पांढरे रंगाचा पिक जिप (१एस ३४२३) उभा असलेला दिसला. प्रभारी अधिकारी राजेंद्र सानप यांनी जनावराची वाहतूक करणा-या लोकांबाबत व वाहनाबाबत चौकशी केली. या दरम्यान त्यांनी जनावरांची वाहतूक करणारे पकडलेल्या दोघांना दाखविले. पकडलेल्या पिकअप जिप दाखवली त्यावर पिकअप जिपची पाहणी केली. यावेळी पाठीमागील हौदामध्ये गाईचे १२ वासरे मिळाली.आले. पाय दाव्याने बांधलेले व ते एकमेकांचे अंगावर टाकलेले दिसले. त्यानंतर पकडलेल्यांपैकी चालक म्हणून कोण काम पाहत होता‌. या व्यक्तीबाबत तेथे जमलेल्या लोकांकडे विचारपुस केली असता, त्यांनी दाखविलेल्याचे नांव पत्ता विचारला असता त्याने शाहरुख सुलतान कुरेशी (वय २५, राजामा मस्जीदजवळ, कुरेशीगल्ली, राहुरी बु. ता. राहुरी, जि. अ.नगर) व त्याच्यासोबत असलेल्या दुस-याकडे जनावरांची वाहतूक करण्याचा परवान्याबाबत विचारले असता त्यांनी परवाना नसल्याचे सांगितले. त्यानंतर वासरे कोठे घेऊन चालले, याबाबत विचारले असता त्यांनी वासरे ही नगर येथे कतलीसाठी घेऊन जात असल्याचे सांगितले.
तपास दरम्यान ५ हजार ५०० रु. कि. साबडया, पांढ-या व काळे पांढ-या रंगाचे अंदाजे 30 दिवस वयाचे गाईचे वासरे, ३ लाख २५ हजार रु. किंमतीचे पांढरे रंगाचा महींद्रा पिकअप मालवाहतूक (एमएच १ एलए ३४२३) असा ३ लाख ३० हजार ५०० रु. किं. दोन्हीही मुद्देमाल आरोपी व मिळून आलेल्या महींद्रा पिकअप वाहन त्यातील गाईचे वासरांसह जप्त करण्यात आले.‌ पोकॉ सुरज देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पशुसंवर्धन अधी १९७६ चेक ११(१) (ई) (३) तसेच प्राण्या प्रतीबंधक अधी १९६ व ५ चे ८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

👉कोपरगाव पोलिस ठाणे : शेतमाल चोरी करणा-या चोरट्यांना १२ तासाचे आत पकडले

Nagar Reporter
कोपरगाव :
शेतक-यांचा शेतमाल चोरी करणा-या चोरट्यांना १२ तासाच्या आत पकडण्याची महत्त्वपूर्ण कारवाई कोपरगाव तालुका पोलीसांनी केली. संशयीत संतोष भास्कर पवार (वय ३२), शंकर नामदेव माळी ( वय २८), राहुल आप्पा ठाकरे (वय २९, सर्व रा.ब्राम्हणगाव,ता.कोपरगाव) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.
एसपी राकेश ओला, श्रीरामपूर ‌अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती स्वाती भोर मॅडम, शिर्डी डिवायएसपी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोनि वासुदेव देसले, पोसई कुसारे, सफौ. ए. एम. आंधळे पोकॉ. रशीद शेख, पोकॉ. के.वी. सानप व चालक पोना. साळुंखे आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली आहे.

दि.२१ मार्च २०२३ रोजी रात्री ११ वाजण्याच्या व दि.२२ मार्च २०२३ रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास कोपरगाव पोलीस ठाणे हद्दीतील ब्राम्हणगाव गावचे शिवारातून शेतकरी रमेश भिकाजी आंबीलवादे ( वय ५०, रा.ब्राम्हाणगाव ,ता.कोपरगाव) यांच्या कांद्याचे चाळीतून ब्राम्हणगाव शिवार येथून २० हजार रु. कि.चे चार क्विंटल सोयाबीन व १२ हजार रु.किं.ची ५० किलो गव्हाची गोणी कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेले होते, या घटनेच्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गु.र.नं.१४५/२०२३ भादवी कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दाखल गुन्ह्याचा कोपरगाव तालुका पोलीस टिमकडून तपास सुरु होता. हा तपासा सुरु असताना पोनि वासुदेव देसले यांना मिळालेल्या माहितीनुसार
पोलीस स्टाफ पाठवून संशयीत संतोष भास्कर पवार, शंकर नामदेव माळी, राहुल आप्पा ठाकरे, (सर्व रा.ब्राम्हणगाव,ता.कोपरगाव) यांना चौकशी कामी ताब्यात घेतले. त्यांच्या कडे चौकशी केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागली. पोलिसांनी पोलिस खाक्या दाखविताच सोयाबीन धान्य चोरी केलेबाबत मान्य केले. त्यांना गुन्ह्यात अटक न्यायालयासमोर हजर केले व त्यांची पोलीस कोठडी मिळाली, कोठडीची मुदतीत त्यांना विश्वासात घेऊन त्यांचेकडे विचारपुस करता त्यांनी गुन्ह्यातील चोरी केलेला मुद्देमाल हा आरोपी शंकर नामदेव माळी (रा. ब्राम्हणगाव, ता. कोपरगाव) याच्या राहत्या घरात ठेवला असल्याचे सांगितले. आरोपीकडून गुन्हयातील चोरी केलेला मुद्देमाल २० हजार रु. किं.चे चार क्विंटल सोयाबीन व २)१२ हजार रु. किं.ची ५० किलो गव्हाची गोणी असा शेतमाल व गुन्हा करताना वापरलेल्या १‌लाख १५ हजार रु. किंमतीच्या तीन विना क्रमांकाच्या दुचाकी त्यात बजाज प्लॅटीना, बजाज एक्ससीडी, टिव्हीएस स्टार सिटी कंपनीच्या असा एकूण १ लाख ३६ हजार २०० रु. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. शेतक-यांचा जिव्हाळ्याचा शेतमाल चोरीसारखा गंभीर गुन्हा केवळ १२ तासाच्या आत उघडकीस आणला आहे. त्यामुळे कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे नव्याने रुजू झालेले पोनि.वासुदेव देसले व त्यांचे सहकारी यांचे व शेतकरी वर्गातून कौतुक होत आहे.

👉भिंगार कॅम्प पोलिस ठाणे : अजामीनपात्र वॉरंट मधील ५ जण अटक
Nagar Reporter
अहमदनगर:
अजामीनपात्र वॉरंटमधील पाच आरोपींना जेरबंद करण्यात भिंगार कॅम्प पोलीसांना यश आले आहे. अक्षय संजय भिंगारदिवे (रा.निंबोडी ता.जि. अहमदनगर), रामा अंकुश इंगळे (रा. निंबोडी ता. जि. अहमदनगर), पवन राजेंद्र नायकू (रा. नेहरू चौक, भिंगार ता. जि. अहमदनगर), स्वप्निल सुधाकर शेलार (रा. शिवाजी चौक, भिंगार ता. जि. अहमदनगर) महेश सुरेश गायकवाडी (रा.सरपणगल्ली, भिंगार ता.जि. अहमदनगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, नगर शहर डिवायएसपी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे सपोनि दिनकर मुंडे यांच्या सूचनेनुसार गुन्हे शोध विभागाचे पोहेकाँ जालिंदर आव्हाड, पोहेकॉ बिभीषन दिवटे, पोहेकाँ रघुनाथ कुलांगे, पोना राहुल द्वारके, पोकाँ सागर तावरे, पोकाँ अमोल आव्हाड, पोकाँ संदिप शिंदे, चापोकाँ अरूण मोरे, चापोकाँ भागचंद लगड, होम/ इरफान पठाण आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली.

न्यायालयाने भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीमधील आरोपींना अजामीनपात्र वॉरंट बजावण्याकामी भिंगार कॅम्प पोलिसांकडे वॉरंट प्राप्त झाले. यानंतर दि. २५ मार्चला रात्र गस्तीवरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीमधील आरोपी पाचजणांना वॉरंटची बजावून त्यांना वॉरंटमध्ये अटक करून न्यायालयासमोर हजर केले आहे.आरोपी यांना वारंवार समन्सची तसेच जामीनपात्र वॉरंट ची बजावणी करून सुद्धा ते न्यायालयासमोर हजर राहत नव्हते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,300SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!