अहमदनगर क्राईम बुलेटिन

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork

👉अहमदनगर आर्थिक गुन्हे शाखा : नगर जिल्ह्यातील मल्टीपल निधी लि.कडून अनेकांची आर्थिक फसवणूक
Nagar Reporter
अहमदनगर :
टचलाईफ मल्टी ट्रेड प्रा. लि., शनीछत्र अर्बन जवळके मल्टीनिधी लि., अहमदनगर कुरीज प्रा. लि., अहमदनगर अर्बन मल्टीपल निधी लि., श्रीओम शनी छत्र अर्बन या संस्थांनी आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी अहमदनगर आर्थिक गुन्हे शाखेत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
एसपी राकेश ओला यांच्या आदेशान्वये गुन्हा पुढील तपासकामी आर्थिक गुन्हे शाखा, अहमदनगर येथे वर्ग झालेला आहे. या गुन्ह्याचा तपास अहमदनगर आर्थिक गुन्हे शाखेचे सपोनि अभिजीत जाधव हे करीत आहेत.

याबाबत समजलेली माहिती अशी की, अहमदनगर जिल्ह्यातील मल्टीनिधी, कंपनीतील चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालकांनी यातील ठेवीदार व गुंतवणुकदार यांना ज्यादा व्याजाचे आमिष दाखवून त्यांना मल्टीनिधी, कंपनी पिग्मी डिपॉजिट खाते, फिक्स डिपॉजिट खाते, वैयक्तीक बचत खाते, सदस्य रिकरींग खाते, वैयक्तीक सिक्युरीटी डिपॉजिट खाते, एफ. डी खात्यामध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडून गुंतवणुकदारांनी गुंतवणूक केलेल्या रक्कमेची मुदतपूर्तीनंतर तिचा परतावा न देता त्यांची अफरातफर करुन आर्थिक फसवणूक केली आहे, या फिर्यादीवरुन शिर्डी पोलीस ठाण्यात येथे गु.र.क्र.1 १९/२०२३ भा.द.वि.क. ४२०, ४०६, ५०६, १२०(ब), ३४ सह महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंधाचे संरक्षण अधिनियिम (वित्तीय आस्थापना) १९९९ (MPID) चे कलम ३ व ५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
👉आर्थिक गुन्हे शाखेचे नागरिकांना आवाहन
मल्टीनिधी कंपनीचे कोपरगांव शाखेमध्ये व अहमदनगर जिल्हयात वरील प्रमाणे इतर कंपनीत गुंतवणूक केलेल्या साक्षीदार / गुंतवणूकदार यांनी त्याचे कडे असलेल्या गुंतवणुकीबाबतचे कागदपत्रासह गुन्ह्याचे तपासकामी आर्थिक गुन्हे शाखा कार्यालय अहमदनगर येथे संपर्क साधावे. असे आवाहन केले आहे.

कमलाकर जाधव
पोलीस उप अधीक्षक आर्थिक गुन्हे शाखा अहमदनगर

👉शिर्डी पोलिस ठाणे : दुचाकी चोरटा पकडला

Nagar Reporter
शिर्डी :
दुचाकी चोरी करून स्वतःच्या फायद्यासाठी वापरणाऱ्यास शिर्डी पोलिसांनी सांगितले. विजय भानुदास कु-हाडे, वय ३९,रा. खंडोबा चौक राहाता, जि. अहमदनगर) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
एसपी राकेश ओला, श्रीरामपूर अपर पोलीस अधिक्षक श्रीमती स्वाती भोर व शिर्डी डिवायएसपी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलिस ठाण्याचे पोनि नंदकुमार दुधाळ, पोसई माळी, पोना गडाख, पोकाॅ अंधारे, पोकॉ शेलार, पोकाॅ शिंदे आदिंच्या ‘टिम’ने केली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की,शिर्डी पोलीस ठाणे हद्दीमध्ये होणाऱ्या दुचाकी चोरी, सोनसाखळी चोरी व इतर गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी‌ एसपी राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलिस ठाण्याचे पोनि नंदकुमार दुधाळ यांनी सर्व अधिकारी व अंमलदार यांना शिर्डी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या वेळी नाकाबंदी व गस्त घालून कारवाई करण्याबाबत आदेशीत केले होते. त्यावरून दि. २० मार्च २०२३ रोजी सायंकाळी ५.३० वा. ते ६.३० वाजण्याच्या दरम्यान साईश कॉर्नर, शिर्डी येथे स्वतः पोनि दुधाळ, पोसई माळी, पोना गडाख, पोकों अंधारे, पोकों शेलार, पोकॉ शिंदे व होमगार्ड ठोसर असे नाकाबंदी करून संशयीत वाहनांची तपासणी करत असताना विजय भानुदास कु-हाडे (वय ३९, धंदा मजुरी, रा. खंडोबा चौक राहाता, जि. अहमदनगर) हा त्याच्या ताब्यातील एका निळ्या व काळ्या रंगाची विना नंबरच्या हिरो कंपनीची एच एफ डिलक्स दुचाकीवर जात असताना मिळून आला. चालकास थांबवून त्याच्याकडे गाडीच्या मूळ कागदपत्रांबाबत विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे देवून कागदपत्र सादर करण्यास असमर्थत दर्शविली. त्यावर संशय वाढल्याने गाडीची तपासणी केली असता गाडीचा चेसीस नंबर खोडलेला असल्याचे दिसले. त्यावेळी पोलीस ठाण्यात आणून त्याला विश्वासात घेऊन त्याकडे सखोल चौकशी केली. त्याने गाडी चोरी केली असल्याची कबुली दिली. त्यावरून पोसई माळी यांनी लागलीच दोन पंचाना बोलावून गाडी पुढील कायदेशीर कारवाई कामी पंचनामा करून जप्त केली. शिर्डी पोलीस ठाण्याचे पोनि श्री दुधाळ यांच्या आदेशावरून पोकाॅ सतपाल शिंदे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली. फिर्यादीवरून शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि.नं. १९५ / २०२३ भादंवि कायदा कलम ३७९ प्रमाणे दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा अधिक तपास शिर्डी पोलीस करीत आहेत.
👉शिर्डी पोलिसांचे नागरिकांना आवाहन
शिर्डी पोलीस ठाणे हद्दीतील कोणालाही विना नंबरची संशयीत वाहने अथवा संशयित ज्याचा एखाद्या मालमत्तेच्या अथवा शरीराविरूध्दच्या गुन्ह्याशी संबंध आहे, असे वाटल्यास शिर्डी पोलीस ठाणे( ०२४२३-२५५१३३) यावर संपर्क साधावा.
पोलीस निरीक्षक
शिर्डी पो. अ. अ. नगर

👉श्रीरामपूर शहर पोलिस ठाणे : १ गाई, ८ बैलांची कत्तलीपासून सुटका
Nagar Reporter
श्रीरामपूर –
गोवंशीय जातीच्या रु १ लाख ७० हजार रुपये किंमतीचे १ गाई, ८ बैल यांची कत्तलीपासून श्रीरामपूर शहर पोलीसांनी सुटका केली.
एसपी राकेश ओला, श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, श्रीरामपूर डिवायएसपी संदिप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोनि हर्षवर्धन गवळी यांच्या सूचनेनुसार पोहेकॉ शफिक शेख, पोना अमोल जाधव, पोना रघुवीर कारखेले, पोकॉ राहुल नरवडे, पोकाॅ गौतम लगड, पोकॉ रमिझ अत्तार, पोकॉ गणेश गावडे, पोकॉ मच्छिंद्र कातखडे, पोकॉ शिवाजी बडे, पोकॉ आजिनाथ आंधळे, पोकॉ संभाजी खरात आदिंच्या टिम’ने कारवाई केली.

मोहसीन उर्फ बुंदी इसाक कुरेशी याच्याविरुध्द श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात गुरनं 288/2023 महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) अधिनियम 1955 चे सुधारित कायदा सन 2015 चे कलम 11, च, ज, छ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा अधिक तपास हा पोना अमोल जाधव हे करीत आहेत.

👉कोतवाली पोलिस ठाणे : नगर शहर परिसतातील ३ कॉफी कॅफेवर कारवाई
Nagar Reporter
अहमदनगर :
तरुण-तरुणींना अश्लील हावभाव अथवा अश्लील कृत्ये करण्यास सुलभता मिळावी तसेच अशी कृत्ये करण्यास त्यांना जागा उपलब्ध करून देऊन त्याबदल्यात तासाप्रमाणे पैसे घेणाऱ्या नगर शहरातील 3 कॅफे शॉपवर पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली आहे.
एसपी राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, नगर शहर डिवायएसपी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस ठाण्याचे पोनि चंद्रशेखर यादव यांच्या सूचनेनुसार पोहेकॉ.सतीश भांड, पोलीस अंमलदार गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, रियाज इनामदार, योगेश खामकर, संदीप थोरात,अमोल गाढे,सुजय हिवाळे,कैलास शिरसाठ,सोमनाथ राऊत,सागर मिसाळ,श्रीकांत खताडे आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली आहे.

अहमदनगर शहर परिसरातील चाणक्य चौकातील रिच किंग कॅफे, भोसले आखाडा येथील बेला कॅफे, चाणक्य चौकातील कॅरेमेला कॅफे या तीन कॅफेंवर ही कारवाई करण्यात आली आहे.कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तसेच नगर शहर परिसरातील नागरिकांकडुन याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.या अनुषंगाने पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशोध पथकाच्या अंमलदारांनी कॅफेंची अचानक तपासणी केली असता हा प्रकार आढळून आला. तसेच या कॅफेवर विना परवाना खाद्य गृहातून खाद्य पदार्थांची ग्राहकांना विक्री करताना आढळून आल्याने त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायद्याप्रमाणे खटला दाखल करण्यात आला आहे.

👉कोतवाली पोलिस ठाणे : खुनाचा प्रयत्न करून फरार झालेला सराईत गुन्हेगार अटक

Nagar Reporter
अहमदनगर :
खूनाचा प्रयत्न करुन फरार असणाऱ्या सराईत गुन्हेगारास पकडण्यात कोतवाली पोलिसांना यश आले आहे. विजय भनगाडे (रा भोरीचाळ रेल्वेस्टेशनरोड, अहमदनगर) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, नगर शहर डिवायएसपी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवालीचे पोनि चंद्रशेखर यादव यांच्या सूचनेनुसार पोसई मनोज कचरे, पोलीस अंमलदार गणेश धोत्रे, शरद बाघ, योगेश भिंगारदिवे, अब्दुलकादर इनामदार, योगेश खामकर, संदिप थोरात, अमोल गाढे, सुजय हिवाळे, कैलास शिरसाठ, सोमनाथ राऊत, सागर मिसाळ आदिंच्या टिमने ही कारवाई केली.

याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.७ जानेवारी २०२३ रोजी आनंदऋषिजी हॉस्पीटल अहमदनगर येथे औषधोपचार घेत असतांना जबाब दिला की, रात्री हॉटेल परिमलचे कंपाऊंड येथे दारु पाजण्यास नकार दिल्याच्या कारणावरुन विजय भनगाडे ( रा भोरीचाळ रेल्वेस्टेशनरोड, अहमदनगर) व त्याचे इतर साथीदारांनी गळयावर चाकूने डोक्यात चॉपरने वार करून जखमी करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला, तसेच लाथाबुक्यांनी शिवीगाळ, मारहाण केली आहे. या महेश गोरख आठवले ( रा प्लॉट नं. ७३ रेल्वेस्टेशन अहमदनगर) यांच्या फिर्यादीवरून तथा दवाखाना जबाबावरुन कोतवाली पोलीस ठाण्यात गुरनं. ३२ /२०२३ भादंवि कलम ३०७,३२६,३२३, ५०४,३४ महापोकाक ३७ (१) (३) १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हा पासून सर्व आरोपी फरार झालेले होते.
हा गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी विजय गजानन भनगाडे (वय ३१) हा नजरेआड झालेला होता. त्याचा शोध घेत असतांना कोतवाली पोलीसांना माहिती मिळाली की, आरोपी विजय भनगाडे हा त्याचे राहत्या घरी येणार आहे. अशी माहिती मिळाल्याने पोनि चंद्रशेखर यादव यांच्या सूचनेनुसार गुन्हेशोध पथकाने रेल्वेस्टेशन येथील त्याचे राहत्या घराजवळ सापळा लावून आरोपी विजय भनगाडे यास मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे गुन्ह्याचे अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्यास अधिक विश्वासात घेवून चौकशी करता त्याने गुन्हा केला असल्याची कबुली दिली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोसई मनोज कचरे हे करित आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,300SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!