अहमदनगर क्राईम बुलेटिन

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork

सोशल मीडियावर आक्षेपार्ह चित्रफीत टाकणाऱ्यावर कारवाई ; पोलिसांनी धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्याच्या आवळल्या मुसक्या
Nagar Reporter
अहमदनगर
: सोशल मिडीया माध्यमातून दोन धर्मामध्ये तेढ निर्माण होईल, असा आक्षेपार्ह चित्रफित एकाने बनवून तो सोशल मिडीयाच्या साईटवर टाकला आहे. धर्माधर्मात तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य त्याने त्या चित्रफितीत केले आहे. हे निर्दशनास येताच, कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, संबंधित आरोपी अयान अजीज शेख (रा. काटवन खंडोबा, अहमदनगर) यास पकडून अटक केली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, एक युवक सोशल मिडीयाच्या साईटवर दि.२ मार्चला रात्री १० वाजता चित्रफित पाहत होता. त्यावेळेस त्याला सोशल मिडीयाच्या साईटवर दोन धर्मात तेढ निर्माण होईल, असा आक्षेपार्ह चित्रफित दिसून आली. त्या युवकाने जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील सायबर पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार नोंदविली होती. सायबर पोलिसांनी या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी केली. सोशल मिडीयाच्या साईटवर हे खाते अयान अजीज शेख (रा. काटवन खंडोबा, अहमदनगर) याचे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार त्याच्याविरूद्ध कोतवाली पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोतवाली पोलिस ठाण्याचे पोनि चंद्रशेखर यादव यांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. गोपीनीय शाखेचे सपोउनि राजेंद्र गर्गे, पोकाॅ योगेश खामकर, अभय कदम, उमेश शेरकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलिस उपनिरीक्षक सुखदेव दुर्गे पुढील तपास करीत आहे.

नव-यावरच बायकाकडून अत्याचार केलाचा गुन्हा
Nagar Reporter
अहमदनगर :
बायकोच्या इच्छेविरोधात संबंध केल्याप्रकरणी नव-याविरोधात भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात अत्याचार, अनैसर्गिक अत्याचार, अ‍ॅट्रॉसिटी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित बायकाने फिर्याद दिली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, युवतीने ऑक्टोबर २०२० रोजी मुकुंदनगर येथील युवकाबरोबर नोंदणी पद्धतीने विवाह केला. तेव्हापासून ती सासरी राहत होती. ते दोघे दि.२१ डिसेंबर २०२२ पर्यंत एकत्र राहिले. तिला दि. २१ डिसेंबर २०२२ रोजी रात्री पतीने फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे तिने घाबरून पोलिसांना फोन करून, पती घरी आल्यानंतर केव्हाही मारतील, मला घेऊन जा’, असा फोन केला. पोलिसांनी तातडीने दखल घेऊन घटनास्थळी आले. तिने पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. त्यानंतर त्यांच्यात वाद झाल्याने तिने विषारी औषध सेवन केले होते.
दरम्यानच्या काळात नव-याने एका महिलेस घरी आणले होते. तिघे सोबत राहण्यासाठी बळजबरी करत होता. तिने त्यांच्यासोबत न राहता ती बहिणीकडे राहण्यासाठी गेली. त्यानंतर तो बहिणीचे घरी येऊन बळजबरीने अनैसर्गिक कृत्य करत होता. त्यांना जातीवादी शिवीगाळ ही करत होता. या तरूणीने दिलेल्या फिर्यादीविरूध्द भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात अत्याचार, अनैसर्गिक अत्याचार, अ‍ॅट्रोसिटी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आंतरराष्ट्रीय ‘क्रिप्टो करन्सी’ व्यवहारात ५ लाखांची फसवणूक

Nagar Reporter अहमदनगर : आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या ‘क्रिप्टो करन्सी’ या व्यवहारामध्ये ५ लाखांची फसवणूक झाली आहे. अमित भंडारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, अमित भंडारी (रा. डोकेनगर, निर्मलनगर) यांना दि. २१ फेब्रुवारी २०२३ रोजी ‘ बीटीसी रोड ॲण्ड वेल्थ’ या व्हॉटसअल ग्रुपमध्ये घेण्यात आले. ग्रुप ॲडमिन मिचाले यांनी त्यांना या ग्रुपमध्ये घेतले होते. क्रिप्टो करन्सी व्यापारात काम करणाऱ्यांचा हा ग्रुप होता. या ग्रुपवर व्यापाराची व एकमेकांना झालेल्या नफ्याची माहिती दिली जात होती. ग्रुप ॲडमिन यांनी यांच्याशी संपर्क साधल्यावर क्रिप्टो करन्सीमध्ये पैशांची गुतवणूक केल्यास जादा नफा मिळत असल्याचे सांगितले. क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुकीसाठी ‘प्ले स्टोअर’मधून बिनांस व यूसीसी वॉल्ट हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानुसार काही रक्कम गुंतवणूक केल्यानंतर नफा बँक खात्याच जमा झाला. त्यामुळे त्यांच्यावर विश्‍वास बसला.
ग्रुप ॲडमिन मिचाले यांनी ता. २६ फेब्रुवारी रोजी मार्केटची स्थिती चांगली असल्याने जादा गुंतवणूक करा, जादा नफा मिळेल, असे सांगितले. त्यानुसार २ लाखांची गुंतवणूक केली. त्यावर १२ लाखांचा नफा झाल्याचे व्हॉट्सअप ग्रुपवर दाखविण्यात आले. ही रक्कम काढण्यासाठी बिनांस करन्सी ॲपवाल्यांनी ३ लाख ४७ हजार रूपये कमिशन भरण्यास सांगितले. तसेच ४ हजार २२३ रूपये कर भरण्यास सांगितले.
भंडारी यांना या व्यवहाराबद्दल संशय आल्याने त्यांनी ग्रुप ॲडमिन मिचाले यांच्याकडे मुद्दलाची मागणी केली असता, त्यांनी कमिशन आणि कर भरल्याशिवाय काही करता येणार नसल्याचे सांगितले. त्यानंतर कमिशन आणि कर भरला. तरीही पैसे मिळाले नाहीत. प्ले स्टोअरमध्ये यूसीसी वॉल्ट हे ॲप्लिकेशन शोधले असता, ते ॲप्लिकेशन काढून टाकण्यात आलेले होते. त्यामुळे फसवणूक झाल्याची खात्री झाली. भंडारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ग्रुप ॲडमिन मिचाले (नाव, पत्ता माहित नाही) याच्याविरूद्ध फसवणूक आणि माहिती-तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक जे.सी. मुजावर पुढील तपास करीत आहेत.

घर मालकाकडून भाडेकरूला मारहाण
Nagar Reporter
अहमदनगर:
घर मालकाकडून भाडेकरू महिला व तिच्या नातेवाईकांना मारहाण करण्यात आली. सावेडी उपनगरातील तपोवन रस्त्यावरील फणसेमळा येथे मंगळवारी (दि. ७) ही घटना घडली. या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, अश्‍विन राजू केदारी (वय २८, रा. भिस्तबाग नाका, सावेडी) यांच्यावर जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांनी दिलेल्या जबाबावरून तोफखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, बहिण ही तपोवन रस्त्यावरील फणसे मळा येथील लता सुभाष फणसे यांच्या घरात भाडेकरू म्हणून राहत आहे. ती ज्या कंपनीत कामाला आहे, ती कंपनी गेल्या दोन महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे तिचे भाडे थकले होते. त्यामुळे घरमालक लता फणसे आणि राहुल आणि अभिजित फणसे यांनी तिचे घरातील संसारोपयोगी साहित्य घराबाहेर फेकून देण्यास तसेच तिला मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यामुळे तिने मदतीसाठी फोन करून बोलवून घेतले. फणसेमळा या ठिकाणी पत्नी, आईस गेल्यावर राहुल फणसे याने लोखंडी गजाने मारहाण करण्यास सुरूवात केली. या मारहाणीमुळे जिल्हा शासकीय रूग्णालयात येऊन आंतररूग्ण म्हणून उपचार घेत आहे. आता पूर्ण शुद्धीवर येऊन जबाब दिला आहे. या जबाबानुसार तोफखाना पोलिसांनी आरोपी लता फणसे, राहुल आणि अभिजित फणसेसह इतर अनोळखी तीन ते चार जणांविरूद्ध गंभीर दुखापती केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

नेप्तीमध्ये दारूभट्टीवर छापा
Nagar Reporter
अहमदनगरः
स्थानिक गुन्हे शाखेने नेप्ती (ता. नगर) येथील दारूभट्टीवर छापा टाकला. आरोपी गोरख बाबा जपकर (वय ३०, रा. रानमळा, नेप्ती) याच्या ताब्यातून गावठी दारू आणि कच्चे रसायन असा ६९ हजार रूपयांचे साहित्य जप्त नष्ट करण्यात आले.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार तानाजी हिंगडे, संदीप पवार, संदीप घोडके, मेघराज कोल्हे, योगेश सातपुते, विनोद मासाळकर, उमाकांत गावडे यांच्या पथक मंगळवारी (ता.७) दुपारी ही छापा टाकला. गोरख जपकर याच्या ताब्यातून ९० लिटर गावठी दारू, १ हजार २०० लिटर दारू तयार करण्याचे कच्चे रसायन असा ६९ हजारांचे साहित्य नष्ट करण्यात आले.या प्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोतवाली हद्दीत पुन्हा गोमांस वाहतूक करताना कारवाई
Nagar Reporter
अहमदनगर‌ः
झेंडीगेट परिसरात गोवंशीय जनावरांची कत्तल करून ते मांस औरंगाबाद येथे घेऊन जाणाऱ्या पिकअप कोतवाली पोलिसांनी पकडला. सोमवारी रात्री पोलिसांनी ही कारवाई केली. तिघांवर गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे.

पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना गोपीनीय माहिती मिळाली की, गोवंशीय मांसाचे पिकअप वाहन हे सोमवारी (ता.६) रात्री झेंडीगेट येथून औरंगाबादकडे जाणार आहे. त्यांनी गुन्हे शोध शाखेचे पोलिस उपनिरीक्षक उपनिरीक्षक मनोज कचरे, अंमलदार गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, रियाज इनामदार, योगेश खामकर, संदीप थोरात, कैलास शिरसाठ, सोमनाथ राऊत, अमोल गाढे, सुजय हिवाळे, सागर मिसाळ यांच्या पथकाला कारवाईचे आदेश दिले. या पथकाने संशयितरित्या पिकअप पकडून एक लाख ८० हजार रूपये किमतीचे ९०० किलो मांस व साडे तीन लाखांचा पिकअप असा पाच लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गौस उर्फ शाहरूख मोहंमद कुरेशी (रा. झेंडीगेट) याच्या मालकीचे हे मांस असल्याचे निष्पन्न झाले आहे. तो पसार झाला आहे. आरोपी असद गफुर शेख (वय ३२, रा. वाळकी, ता. नगर), आयान जाकीर कुरेशी (वय १९, रा. झेंडीगेट) यांना अटक करण्यात आली आहे.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास २० वर्षांची शिक्षा
Nagar Reporter
अहमदनगर :
अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केल्याबद्दल शिवाजी भाऊराव सुर्यवंशी (वय ३७ रा. ब्राम्हणी ता. राहुरी) याला अतिरिक्त व विशेष (पोक्सो) जिल्हा व सत्र न्यायाधीश माधुरी मोरे यांनी २० वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रूपये दंड, अशी शिक्षा ठोठावली. अ‍ॅड. मनिषा केळगंद्रे – शिंदे यांनी सरकारीतर्फे काम पाहिले.
मुलीला अज्ञात व्यक्तीने पळून घेऊन गेल्याची फिर्यादी तिच्या काकाने ता. १६ नोव्हेंबर २०२१ चे राहुरी पोलीस ठाण्यात दिली होती. पोलिस उपनिरीक्षक तुषार धाकराव तसेच सहाय्यक उपनिरीक्षक सी. एन. बऱ्‍हाटे यांनी तपास केला. शिवाजी सूर्यवंशी याचे लग्न झालेले असताना त्याने लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केला. तिच्या आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. स्वतः विष पिऊन आत्महत्या करेल, असे ही धमकावले होते. या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे एकूण १० साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये अल्पवयीन पिडीत मुलगी, पीडितेचे काका, पंच साक्षीदार, तपासी अधिकारी यासंदर्भात मुख्याध्यापक, ग्रामसेवक व वैद्यकिय अधिकारी यांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. सरकारी वकिल मनिषा शिंदे यांनी युक्तीवाद केली की, सदरच्या घटनेमधील आरोपी हा विवाहित असून त्यास मुले आहेत. आरोपीचा एक मुलगा व पीडित मुलगी हे एकाच वयाचे होते. आरोपी हा विवाहीत असून देखील हा पीडित अल्पवयीन मुलीस आत्महत्या करण्याची धमकी देऊन पळवून घेऊन गेला. वास्तविक पाहता, सदर केसमधील पीडित मुलगी ही १३ वर्षे वयाची होती. आरोपीने दिलेल्या धमकीमुळे ती पूर्णपणे घाबरून गेलेली होती. सरकारी वकिलांनी केलेला युक्तीवाद व साक्षीदारांच्या साक्षी, पुरावे ग्राह्य धरून शिवाजी सूर्यवंशी यास २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा आणि दोन हजार रूपये दंड, अशी शिक्षा ठोठावली. सदर खटल्याचे कामकाजात पैरवी अधिकारी आडसुळ, अंमलदार पठारे व वाघ यांनी सहकार्य केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!