अहमदनगर क्राईम बुलेटिन

गावठी कट्टा बाळगणाऱ्याला अटक
Nagar Reporter
अहमदनगर‌:
कंबरेला गावठी कट्टा लावून बाजार समिती परिसरामध्ये गांजा ओढणा‍ऱ्या युवकाला कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जॉन कासिनो परेरा (वय ३४, रा. चंदे बेकरीजवळ, बंगाली चौकी) असे पकडलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून एक गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे, चिलीम असा १५ हजार २०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

नगर शहर डिवायएसपी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि चंद्रशेखर यादव यांच्या सूचनेनुसार पोकाॅ गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, संदीप थोरात, सुजय हिवाळे, अमोल गाडे, कैलास शिरसाठ आदिंच्या’टिम’ने सोमवारी दुपारी एक १ वाजण्याच्या सुमारास होळी सणानिमित्त हद्दीत गस्त घालत होते. बाजार समिती परिसरात एक युवक कंबरेला गावठी कट्टा लावून फिरत आहे. तो सध्या बाजार समितीमधील सार्वजनिक स्वच्छतागृहाच्यामागे गांजा पित बसला आहे, अशी माहिती मिळाल्याने गस्ती टिम’ने कारवाई करण्याचे आदेश दिले. टिम’ने पंचासमक्ष छापा टाकला. दरम्यान जॉन परेरा याला पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे गावठी कट्टा व दोन काडतुसे मिळून आले. पोलिसांनी ते जप्त केलेले आहेत. पोकाॅ कैलास शिरसाठ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून परेराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुस्लिम समाजाचा एसपी कार्यालयावर मोर्चा
जातीय तणाव निर्माण करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

Nagar Reporter
अहमदनगर –
हिंदू- मुस्लिम समाजामध्ये जातीय तणाव निर्माण करण्याचा काही संघटना प्रयत्न करीत आहेत. जिल्ह्यातील सामाजिक वातावरण दूषित करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी सकल मुस्लिम समाज मोर्चाने एसपी राकेश ओला यांना भेटून शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे मागणी केली.
रामवाडी येथे अमन शेख या युवकावर रविवारी रात्री धारदार शस्त्राने काही युवकांनी हल्ला केला. या घटनेवर सकल मुस्लिम समाजाच्या वतीने एसपी कार्यालयावर सोमवारी (दि.६) सायंकाळी ४ वाजता मोर्चा काढण्यात आला होता. शहरातील कोठला, मुकुंदनगर भागातून हजारो मुस्लिम समाजाच्या युवक मोर्चात सहभागी झाले होते. शांततेच्या मार्गाने मोर्चा एसपी कार्यालयावर आला. एसपी राकेश ओला यांनी मोर्चातील प्रमुख नेत्यांना आंदोलकांच्या मागण्यांबाबत चर्चा केली. दरम्यान निवेदन स्वीकारले.
समाजाच्या प्रमुख नेत्यांनी एसपींचे समाजात जातीय तणाव निर्माण करणाऱ्यांकडे लक्ष वेधले. जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून काही जातीय वादी संघटना मेळावे घेऊन मुस्लिम समाजाबद्द्ल दूषित वातावरण निर्माण करत आहेत. या संघटना निवडणुका आल्यावर जास्त सक्रिय होत आहेत. जातीयवादी संघटनांच्या पाठिंब्यावर आपल्या उमेदवारांना निवडणुकीत विजयी होण्यासाठी हे मेळावे घेऊन वातावरण दूषित करीत आहेत.
रामवाडी येथे मुलांमध्‍ये किरकोळ कारणावरून वाद झाले होते. याची माहिती काही जातीयवादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना मिळाली. ते तात्काळ घटनास्थळी आले. त्यातून धारदार शस्त्राने युवकावर हल्ला करण्याची घटना घडली. मकरसंक्रातीच्या वेळी ही जातीय तणाव निर्माण करण्यात आला. पोलिसांनी दोन गटांवर समान कलमान्वये गुन्हे दाखल केले नाहीत. एका गटावर गंभीर स्वरूपाचे कलमे लावली तर एका गटावर कमी शिक्षेची कलमे लावली. जिल्ह्यातील सामाजिक वाताकरण दूषित करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

अहमदनगर शहरात युवकावर चॉपरने हल्ला
Nagar Reporter
अहमदनगर
युवकावर चॉपर, रॉड, दांडके व वस्तार्‍याने जखमी करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना रविवारी (दि.५) रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास रामवाडी परिसरातील हॉटेल यशाजंलीजवळ घडली. अमन युनूस शेख (वय १९, रा. तख्ती दरवाजा, माणिक चौक) असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याच्यावर शहरातील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
अमन शेख रविवारी रात्री त्याच्या दुचाकीवरून रामवाडी येथील ॲबेट पेट्रोल पंपावर दुचाकीत पेट्रोल भरण्यासाठी आला. तो गोविंदपुराकडे जात असताना हॉटेल यशाजंलीसमोर निखील धंगेकर व रूद्रेश अंबाडे यांनी त्याला दुचाकी आडवी लावली. तेवढ्यात तेथे विशाल जाधव, कृष्णा भागानगरे, गामा भागानगरे, शिवम घोलप, अक्षय, बंटी साबळे व इतर अनोळखी १० ते १५ जण आले. निखीलने हातातील चॉपरने अमनच्या गळ्यावर जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने वार केला. परंतु, त्याने तो वार चुकविला. त्यानंतर निखीलने छातीवर रूद्रेशने डोक्यावर वार केले. विशालने हातातील गमच्या सहाय्याने अमनच्या गळ्याभोवती आवळून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अनोळखी व्यक्तीने वस्ताऱ्या‍ने वार केले. इतरांनी रॉड, दांडक्याने हल्ला करून जखमी केले.
‘तू पोलिसांत फिर्याद का केली, कुणाल भंडारी व बंटी डापसे हे तुला सोडणार नाहीत’, अशी धमकी दिली. अमन युनूस शेख याने उपचारा दरम्यान तोफखाना पोलिसांना दिलेल्या जबाबावरून आरोपी निखील धंगेकर, रूद्रेश अंबाडे, विशाल जाधव, कृष्णा भागानगरे, गामा भागानगरे, शिवम घोलप, अक्षय, बंटी साबळे व त्यांच्यासह इतर अनोळखी १० ते १५ जण (सर्व रा. रामवाडी) यांच्याविरूध्द खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. तोफखाना पोलिस ठाण्याचे सपोनि कैलास वाघ हे पुढील तपास करीत आहेत.

जुगार अड्ड्यावर छापा
Nagar Reporter
अहमदनगर ः
शहरातील सिध्दीबागेजवळ पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर तोफखाना गुन्हे शाखेच्या टिम’ने छापा टाकला. या छाप्यात ५ जणांना पकडून त्यांच्याकडून रोख रक्कम, जुगाराचे साहित्य, दुचाकी असा ७७ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सिध्दीबागेजवळ एका पत्र्याच्या शेडमध्ये तिरट जुगार सुरू असल्याची माहिती तोफखाना पोलिस ठाण्याचे पोनि मधुकर साळवे यांना मिळाली होती. त्यांनी गुन्हे शोध टिम’चे पोउपनि समाधान सोळुंके, पोकाॅ दत्तात्रय जपे, अहमद इनामदार, वसिम पठाण, संदीप धामणे, संदीप गिऱ्‍हे यांना कारवाई करण्याच्या सूचना केल्या. टिम’ने रविवारी (दि.५) सायंकाळी या ठिकाणी छापा टाकला. ५ जण जुगार खेळताना आढळून आले. त्यांची पंचासमक्ष झडती घेतली असता त्यांच्याकडे रोख रक्कम, जुगाराचे साहित्य व दुचाकी मिळून आली. पोलिसांनी सर्व मिळून ७७ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोकाॅ सतीष भवर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आदित्य सोमनाथ टाक (वय २५. रा. शितळादेवी चौक, तोफखाना), सुनील रमेश गोरे (वय ५७. रा. दत्त चौक, शिवाजीनगर, केडगाव), तुषार सदाशिव आंबेकर (वय ३३, रा. सारसनगर), मुकेश प्रताप कंडारे (वय ३४. रा. एस.टी. कॉलनी, सर्जेपुरा), बबन बाबूराव कोकणे (वय ५८, रा. जाधव मळा, बालिकाश्रम रस्ता) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाहन दुरूस्ती वादातून गॅरेज मालकास मारहाण
Nagar Reporter
अहमदनगर :
वाहन दुरूस्ती करण्याच्या कारणातून झालेल्या वादातून गॅरेज मालकाला लोखंडी पाईपने मारहाण केली. रामदेव गिरीराम शर्मा (वय ५३, रा. दूधसागर सोसायटी, केडगाव) असे मारहाण झालेल्या गॅरेज मालकाचे नाव आहे. शनिवारी (दि.४) सायंकाळी ही घटना केडगाव उपनगरात घडली.

जखमी शर्मा फिर्यादीवरून तन्वीर देशमुख (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. रामदेव शर्मा यांचे केडगाव उपनगरात अहमदनगर-पुणे महामार्गावर सागर हॉटेलच्या पाठीमागे गॅरेज आहे. शर्मा यांच्या ओळखीचा तन्वीर देशमुख त्याची लक्झरी बस येथे दुरूस्ती करण्यासाठी घेऊन येत असतो. शनिवारी सायंकाळी देशमुख हे लक्झरी बस दुरूस्तीसाठी घेऊन आला असता शर्मा व देशमुख यांच्यात वाद झाले. देशमुखने शर्मा यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी व लोखंडी पाईपने मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. शर्मा यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोमांस विक्री करणाऱ्या दोघांवर गुन्हा
Nagar Reporter
अहमदनगर :
गोवंशीय जनावरांची कत्तल करून गोमांस विक्री करणाऱ्या दोघांना कोतवाली पोलिसांनी रविवारी (दि.५) पकडले केली. साहेल जावेद कुरेशी (वय २६), शहेबाज गुलाम साबीर सय्यद (वय १९, दोघे रा. व्यापारी मोहल्ला, झेंडीगेट) अशी आरोपींची नावे आहेत. कोतवालीचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना माहिती मिळाली की, शहरातील झेंडीगेट परिसरात सुभेदार गल्ली येथे गोवंशी जनावरांच्या मांसाची विक्री सुरू आहे. गुन्हे पथकाचे उपनिरीक्षक मनोज कचरे हे त्यांचे पथकासह झेंडीगेट परिसरात जाऊन खात्री केली असता, दोन्ही ठिकाणी मांस विक्री सुरू होती. पथकाची खात्री होताच तेथे छापा टाकून सदर दोन्ही ठिकाणी मांस विकणाऱ्यांना ताब्यात घेतले. त्यांचे पत्र्याचे टपरीची झडती घेतली असता, त्या ठिकाणी ५५० किलो गोमांस, दोन सत्तुर व दोन वजनकाटे असा एकूण एक लाख ११ हजार रूपये किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.
उपनिरीक्षक कचरे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस अंमलदार गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, रियाज इनामदार, योगेश खामकर, संदीप थोरात, कैलास शिरसाठ, सोमनाथ राऊत, अमोल गाडे, सुजय हिवाळे, सागर मिसाळ यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अंमलदार कैलास शिरसाठ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून साहेल कुरेशी, शहेबाज सय्यद या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यांना अटक करण्यात आली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!