अ.नगर एलसीबी : गावठी कट्टे, जिवंत काडतूस बाळगणारे दोघे पकडले
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
श्रीरामपूर : येथील संजयनगर येथे विक्री करण्याच्या उद्देशाने २ गावठी कट्टे व ८ जिवंत काडतूस जवळ बाळगणा-या दोघांना पकडण्यात आले. त्या दोघांकडून ५२ हजार ४०० रुपये किंमतीचे मुद्देमाल जप्त करण्याची कामगिरी अहमदनगर एलसीबी टिम’ने केली आहे.
अक्षय राजु फुलारे (वय २५), शहेबाज युनूस पटेल, (वय ३०, दोन्ही रा. संजय नगर, वॉर्ड नं.२, ता. श्रीरामपूर) असे पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.
एसपी राकेश ओला, श्रीरामपूर अपर पोलिस अधीक्षक स्वाती भोर मॅडम, श्रीरामपूर डिवायएसपी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोनि दिनेश आहेर यांच्या सूचनेनुसार पोसई तुषार धाकराव, पोहेकॉ मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, पोना रविंद्र कर्डीले, सचिन आडबल, पोकॉ रणजीत जाधव, सागर ससाणे व किशोर शिरसाठ आदिंच्या टिम’ने ही कामगिरी केली आहे.

अ.नगर एलसीबी : मोबाईल चोरटे पकडले
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
श्रीरामपूर : श्रीरामपूर परिसरात दुचाकीवर येऊन मोबाईल हिसकावणा-या दोघांना पकडण्यात आले. त्याच्याकडून ८५ हजार रुपये किंमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल व पल्सर दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई अहमदनगर एलसीबी टिम’ने केली आहे.
रामदास लक्ष्मण थोरात (वय ३१, रा. भोकर, ता. श्रीरामपूर), प्रकाश रमेश चाबुकस्वार ( वय २१, रा. भोकर, ता. श्रीरामपूर) असे पकडण्यात आलेल्याचे नावे आहेत.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार एलसीबी पोनि दिनेश आहेर यांनी दिलेल्या सूचनेनुसार एलसीबीचे पोहेकॉ मनोहर गोसावी, पोना रविंद्र कर्डीले, पोकॉ आकाश काळे, मयुर गायकवाड व चापोहेकॉ उमाकांत गावडे आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली.
एलसीबी पोनि दिनेश आहेर यांना मिळालेल्या माहितीनुसार ती माहिती त्यांनी एलसीबी टिम’ला दिली. एलसीबी टिम’ने पंचाना सोबत घेऊन तात्काळ रामदास लक्ष्मण थोरात (वय ३१, रा. भोकर, ता. श्रीरामपूर) याच्या राहते घरी जाऊन शोध घेतला असता तो मिळून आल्याने त्यास ताब्यात घेतले. त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे काळे रंगाचा सॅमसंग कंपनीचा ए-५१ मोबाईल फोन मिळून आला. त्याबाबत विचारपुस करता त्याने मोबाईल हा प्रकाश चाबुकस्वार (रा. भोकर, ता. श्रीरामपूर) याच्याकडून विकत घेतल्याची माहिती दिली. त्यास त्याचे राहते घरा जवळून एक लाल काळ्या रंगाचे बजाज पल्सर दुचाकीसह ताब्यात घेतले. त्याचेकडे नमुद मोबाईल बाबत विचारपुस करता त्याने वर चोरीचा मोबाईल फोन त्याचे साथीदार ज्ञानेश्वर ऊर्फ आरुष गणपत शिडुते (रा. घुलेवाडी, ता. संगमनेर (फरार) व योगेश सिताराम पटेकर (रा. वडाळा महादेव, ता. श्रीरामपूर (फरार) या दोघांनी विक्री करण्यासाठी दिले, अशी कबुली दिल्याने आरोपींचा त्यांचे राहत्या घरी जाऊन शोध घेतला असता ते मिळून आलेले नाहीत.
ताब्यात घेतलेल्या दोन्ही आरोपीचे कब्जातू गुन्ह्यात चोरीस गेलेला १० हजार रुपये किंमतीचा काळे रंगाचा सॅमसंग कंपनीचा ए-५१ व ७५ हजार रुपये किंमतीची लाल काळ्या रंगाचे पल्सर दुचाकी असा एकुण ८५ हजार रुपये किंमतीचे मुद्देमालासह ताब्यात घेतले. त्याना श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात हजर केले आहे. पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहे.