अहमदनगर एलसीबी : ४ वर्षापासून खूनप्रकरणात फरार असणारा पकडला
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : शहरातील लालटाकी येथे झालेल्या खूनप्रकरणात ४ वर्षापासून फरार असणारा आरोपी पकडण्यात अहमदनगर एलसीबी टिम’ला यश आले आहे. बाळू अशोक घोरपडे (वय ३६, रा. सिध्दार्थ नगर, अहमदनगर) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे व नगर शहर डिवायएसपी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोनि दिनेश आहेर यांनी दिलेल्या सुचनेनुसार एलसीबीचे पोहेकॉ मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, देवेंद्र शेलार, पोना विजय ठोंबरे, पोकॉ सागर ससाणे, रोहित येमुल, आकाश काळे व रणजीत जाधव आदिंच्या ‘टिम’ने ही कारवाई केली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, बहिण भारती आव्हाड (रा. पाथर्डी) व शेजारी राहणारे सारीका भारस्कर यांच्या नातेवाईकांचे पाथर्डी येथे भांडणे झाली होती. त्या कारणावरुन दि.१० मे २०१० रोजी दुपारच्या वेळी सारीका भारस्कर व त्यांचे नातेवाईक नितीन दिनकर व इतर आरोपींनी तिची सासू बेबी शिरसाठ व इतर नातेवाईकांना लाकडी दांडके, चाकू, तलवारी या हत्यारांनी मारहाण करुन जखमी करुन सासू बेबी शिरसाठ यांची हत्या केली होती. या घटनेबाबत माया वसंत शिरसाठ (रा. भारस्कर कॉलनी, लालटाकी, अहमदनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुरनं. ५९९/२०१९ भादवि कलम ३०२,१४३,१४७,१४८,१४९,३०७,५०४,५०६ सह भाहकाक ४/२५ सह मपोकाक ३१(१)(३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे एकूण १९ आरोपीविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
एसपी राकेश ओला यांनी फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत एलसीबी पोनि दिनेश आहेर यांना आदेश दिले होते. आदेशान्वये पोनि श्री. आहेर यांनी एलसीबी टिम’ तयार करुन फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या. तपास दरम्यान एलसीबी टिम’ला मिळालेल्या माहितीनुसार एलसीबी टिम’ने जाऊन आरोपीस ताब्यात घेतले. त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव बाळू अशोक घोरपडे (वय ३६, रा. सिध्दार्थ नगर, अहमदनगर) असे सांगितले. त्याचेकडे गुन्ह्याबाबत चौकशी करता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यास ताब्यात घेऊन तोफखाना पोलीस ठाण्यात हजर केले आहे. पुढील कारवाई तोफखाना पोलीस करीत आहे.
अहमदनगर एलसीबी : श्रीरामपूर तालुक्यात अवैध वाळू चोरी व वाहतुकविरुध्द कारवाई, ५ लाखांचा मुद्देमाल जप्त
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : श्रीरामपूर तालुक्यात अवैध वाळू चोरी व वाहतुकविरुध्द कारवाई करुन एक झेनॉन गाडी व एक ब्रास वाळू असा एकूण ५ लाख १० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई अहमदनगर एलसीबी टिम’ने केली.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोनि दिनेश आहेर यांनी एलसीबीचे पोहेकॉ मनोहर गोसावी, पोना संतोष लोढे, पोकॉ रणजीत जाधव, जालिंदर माने, रोहित येमुल व चापोहेकॉ चंद्रकांत कुसळकर आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली आहे.

एलसीबी टिम’ने श्रीरामपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीत कारवाई करुन अवैधरित्या वाळू चोरी व वाहतूक करणा-या ठिकाणी छापा टाकला. यात एकूण ५ लाख १० हजार रुपये किंमतीचा एक झेनॉन मालवाहतूक गाडी व एक ब्रास वाळू असा मुद्देमाल जप्त करण्यात आली. आरोपींविरुध्द श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात भादविक कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. श्रीरामपूर तालुका गु.र.नं. २२६/२०२३ भादविक ३७९ महेश विष्णु बोरुडे (रा. हरेगांव, ता. श्रीरामपूर), सागर धुमाळ (रा. गोंधवणी रोड, ता. श्रीरामपूर), अनुप लोढा (रा. रासकर नगर, ता. श्रीरामपूर) या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला तर ५ लाख १० हजार रुपये किंमतीचा एक पांढरे रंगाचा झेनॉन मालवाहतूक गाडी व एक ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे.