अहमदनगर क्राईम बुलेटिन

नगर एलसीबी : आयपीएल क्रिकेटवर ऑनलाईन सट्टा घेणारा ; शेवगाव तालुक्यातील कारवाई
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
Ahemnagar Crmie News
Nagar Reporter
अहमदनगर
: आयपीएल क्रिकेटवर ऑनलाईन बेटींग (सट्टा) मोबाईलवरुन शेवगाव तालुक्यातील आखेगांव येथील घेणा-यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, १४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई अहमदनगर एलसीबी टिम’ने केली आहे. भागनाथ ऊर्फ सदा विठोबा खरचंद‌ (वय ३७, रा. आखेगांव, ता. शेवगांव) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, व श्रीरामपूर व अतिरिक्त प्रभार शेवगांव डिवायएसपी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोना संतोष लोढे, सचिन आडबल, पोकाॅ रोहित मिसाळ, शिवाजी ढाकणे, जालिंदर माने आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली.

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार एलसीबी पोनि श्री.आहेर हे अवैध धंद्यांची माहिती घेत असताना माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी एलसीबी टिम’ला सूचना दिल्या. एलसीबी टिम’ने पंचाना सोबत घेऊन मुर्शदपुर ( ता. शेवगांव) या ठिकाणी जाऊ खात्री केली. यावेळी एकजण उघडयावर बसून त्याच्या मोबाईलवर काहीतरी खेळताना व वहीमध्ये आकडेमोड करताना दिसला. याचवेळी एलसीबी टिम’ला खात्री होताच त्यास जागीच पकडून त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव भागनाथ ऊर्फ सदा विठोबा खरचंद (वय ३७, रा. आखेगांव, ता. शेवगांव) असे असल्याचे सांगितले. त्याच्या हातातील वही व मोबाईलची पाहाणी केली असता त्याच्या मोबाईलमध्ये आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा लावुन गेम खेळत असल्याचे दिसून आल्याने त्यास हातातील वही व मोबाईल फोनसह ताब्यात घेतले.
त्याची पंचासमक्ष अंगझडती घेता त्याचे अंगझडतीत १४ हजार रुपये किंमतीचा सॅमसंग कंपनी ॲन्ड्रॉईड मोबाईल, रोख रक्कम व आकडेमोड केलेली वही मिळून आल्याने ती जप्त करण्यात आली. एलसीबी पोना संतोष लोढे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शेवगांव पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३७५ / २०२३ महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कायदेशिर कार्यवाही शेवगांव पोलीस करीत आहे.

नगर एलसीबी : जामखेड, श्रीरामपूर तालुक्यात अवैध वाळू चोरुन वाहतूक करणा-यांवर कारवाई

Nagar Reporter
अहमदनगर :
जामखेड व श्रीरामपूर तालुक्यात अवैध वाळू चोरुन वाहतूक करणा-यांवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत दोन हायवा ढंपर, एक टेम्पो व १४ ब्रास वाळू असा एकूण ४६ लाख ४० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्याची धडाकेबाज कारवाई अहमदनगर एलसीबी टिम’ने केली आहे.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार एलसीबी पोनि दिनेश आहेर यांनी दिलेल्या सुचनेनुसार एलसीबीचे पोहेकॉ मनोहर गोसावी, पोना विशाल गवांदे, सचिन आडबल, पोकाॅ रोहित मिसाळ, रणजीत जाधव, सागर ससाणे, आकाश काळे आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली आहे.

पोनि श्री. आहेर यांनी एलसीबी टिम’ला अवैध वाळु चोरी व वाहतुकीविरुध्द कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या. त्याप्रमाणे जामखेड व श्रीरामपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीत कारवाई करुन अवैधरित्या वाळू चोरी व वाहतूक करणा-या दोन ठिकाणी छापे टाकण्यात आले. या छाप्यात एकूण ४६ लाख ४० हजार रुपये किंमतीचे दोन हायवा ढंपर, एक टेम्पो व १४ ब्रास वाळू असा मुद्देमाल जप्त करण्यात आली.
संदेश संभाजी जाधव (रा. म्हेत्रेवस्ती, ता.जामखेड), अमोल आजबे (रा. जमदारवाडी, ता. जामखेड), केतन कांतीलाल धनवे (रा. डोनगांव, ता. जामखेड), बापू मोरे (रा. मोरेवस्ती, ता. जामखेड) व सुनिल छगन रजपुत ( रा. मांजरी, ता. गंगापुर, जि. छत्रपती संभाजीनगर) या ५ जणांविरुद्ध जामखेड व श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात भादविक सह पर्यावरणकायदा कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नगर एलसीबी : खून करणाऱ्या दोघे आरोपी १२ तासात पकडले
Nagar Reporter
अहमदनगर
: शहरात घरफोडी चोरी करणा-या सराईत आरोपीच्या डोक्यात दगड घालून खून करणाऱ्या दोघां आरोपींना १२ तासाच्या आत अहमदनगर एलसीबी टिम’ने जेरबंद करण्यात आले आहे. सनी संजय डाके ( वय १९), दिपक रावसाहेब चांदणे (वय २८, दोन्ही रा. सिध्दार्थनगर, झोपडपट्टी, अहमदनगर) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे व नगर शहर डिवायएसपी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोनि दिनेश आहेर यांनी दिलेल्या सूचनेनुसार एलसीबीचे सफौ राजेंद्र वाघ, संजय खंडागळे, पोहेकॉ देवेंद्र शेलार, सुरेश माळी, पोना विशाल दळवी, पोकॉ सागर ससाणे व चापोना भरत बुधवंत आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, पती लखन अनिल घोरपडे असे लालटाकी येथील ज्युसची गाडीजवळ बसलेले असताना ज्युस गाडीचा मालक मुन्नाभाई याने चेष्टेत पती लखन यांच्या अंगावर पाणी फेकले. त्यावेळी लखन याने खाली पडलेली फरशी मुन्नाभाई याच्याकडे फेकल्याचे नाटक करत असताना फरशी मागे पडली. त्यावेळी सिध्दार्थनगर येथील सनी डाके, दिपक चांदणे व हंट्या शिंदे ही दुचाकीवर येऊन पती लखन घोरपडे यास आम्हाला फरशी मारतो का, असे म्हणून डोक्यात दगड मारुन जखमी करुन जिवे ठार मारले. या सौ. वंदना विजय घोरपडे (रा. लालटाकी, भारस्कर कॉलनी, अहमदनगर) यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गु.र.नं. ६५६/२०२३ भादविक ३०२,३४ प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर एसपी राकेश ओला यांनी एलसीबी पोनि दिनेश आहेर यांना गुन्हा उघडकीस आणण्यासाठी टिम नेमून समांतर तपास करुन कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते.
आदेशान्वये पोनि श्री. आहेर यांनी एलसीबी टिम’ला सूचना देऊन तात्काळ रवाना केले. या दरम्यान आरोपींची माहिती मिळाली. त्यानुसार पोनि श्री. आहेर यांनी एलसीबी टिम’ला सूचना दिल्या. एलसीबी टिम’ने माळीवाडा बसस्टॅण्ड परिसरात जाऊन सापळा लावून थांबलेले असताना माहितीनुसार दोन संशयीत बसस्टॅण्डच्या दिशेने येताना दिसले. एलसीबी टिम’ला खात्री होताच त्यांना पकडण्याचे तयारीत असताना ते पोलीसांची चाहुल लागताच पळून जाऊ लागल. एलसीबी टिम’ने संशयीतांचा पाठलाग करुन त्यांना शिताफीने ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्यांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांना त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव सनी संजय डाके ( वय १९), दिपक रावसाहेब चांदणे (वय २८, दोन्ही रा. सिध्दार्थनगर, झोपडपट्टी, अहमदनगर) असे असल्याचे सांगितले. गुन्ह्याबाबत विचारपुस करता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांना एलसीबी टिम’ने ताब्यात घेऊन तोफखाना पोलीस ठाण्यात हजर केले आहे. पुढील तपास तोफखाना पोलीस करीत आहे.

वाळकीत दोन गटात हाणामारी : एक मयत
Nagar Reporter
अहमदनगर ः
नगर तालुक्यातील वाळकी येथे रविवारी सायंकाळी दोन गटांत तुफान हाणामा-या झाल्या. यात नाथा ठकाजी लोखंडे (वय ४५)हे मयत झाले. पण ते कोणत्या कारणाने मयत झाले, याबाबत वैद्यकीय अहवाल येणे बाकी असल्याने ते मयत कशाने झाले, याबाबत माहिती समजली नाही. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वाळकीमध्ये मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, नगर तालुक्यातील वाळकी या ठिकाणी कासार व लोखंडे कुटुंबात ही भांडणे पैशाच्या व्यवहारातून झाल्याची प्राथमिक माहिती आहे. कासार कुटुंबातील काही जण लोखंडे कुटुंबाच्या घरी गेले होते. तेथे त्यांच्यात पैशाच्या कारणातून भांडण झाले. या भांडणातून दोन्ही कुटुंबात हाणामारीची घटना घडली. यात दोन्ही कुटुंबातील काही व्यक्ती जखमी झाल्या आहेत. दरम्यान हे भांडण सुरू असताना लोखंडे कुटुंबातील एकाजण मयत झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच नगर ग्रामीण डिवायएसपी अजित पाटील, नगर तालुका पोलिस ठाण्याचे सपोनि शिशिरकुमार देशमुख हे पोलिस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. वाळकी गावात पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता. गावात तणावपूर्ण परिस्थिती आहे. या प्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!