अहमदनगर क्राईम बुलेटिन

अहमदनगर एलसीबी: दुचाकी चोरटे पकडली
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर
: अहमदनगर शहर व पारनेर परिसरातून दुचाकी चोरी करणारे दोन सराईत चोरटे पकडले. चोरट्यांकडून २ लाख ५५ हजार रु. किंमतीच्या तीन दुचाकी हस्तगत करण्याची कारवाई अहमदनगर एलसीबी टिम’ने केली आहे. संदीप बबन बर्डे (वय ३२, रा. खळेवाडी, देहरे, ता. नगर), किरण भाऊसाहेब जाधव (वय २४, रा. वांबोरी रोड, देहरे, ता. नगर) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे व नगर ग्रामीण डिवायएसपी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगर एलसीबीचे पोसई तुषार धाकराव, पोहेकॉ बापुसाहेब फोलाणे, पोना भिमराज खर्से, संदीप दरंदले, रवि सोनटक्के, पोकॉ रविंद्र घुगांसे, मयुर गायकवाड, सागर ससाणे व चापोहेकॉ अर्जुन बडे आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली.

याबाबत समजलेली माहिती अशी की, दि. १८ एप्रिल २०२३ रोजी हॉटेल शिवतेज, टाकळी ढोकेश्वर (ता. पारनेर) येथे त्यांची होंडा कंपनीची शाईन दुचाकी हॉटेलसमोर लावून जेवणासाठी गेले. त्यावेळी अनोळखींनी दुचाकी चोरुन नेली होती. या नवनाथ लक्ष्मण शिंदे ( रा. साडेगांव, ता. आंबड, जि. जालना) यांच्या फिर्यादीवरून पारनेर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४००/२०२३ भादविक ३७९ प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हा गुन्हा दाखल झाल्यानंतर एसपी राकेश ओला यांनी एलसीबी पोनि दिनेश आहेर यांना ना उघड गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पथक नेमून समांतर तपास करुन कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते.
आदेशान्वये पोनि श्री. आहेर यांनी एलसीबी टिम तयार करुन दुचाकी चोरी करणा-यांची माहिती घेऊन कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. एलसीबी टिम’ने अहमदनगर शहर व तालुका परिसर फिरुन आरोपींची माहिती घेत असताना पोनि श्री. आहेर यांना माहिती मिळाली. ती माहिती त्यांनी एलसीबी टिम’ला दिली. माहिती ठिकाणी एलसीबी टिम’ जाऊन संशयीत संदीप बर्डे याच्या घराजवळ जाऊन खात्री केली असता घराबाहेर तो उभा असलेला दिसला त्यास शिताफीने ताब्यात घेतले. यावेळी त्याने त्यांचे नाव संदीप बबन बर्डे (वय ३२, रा. खळेवाडी, देहरे, ता. नगर) असे असल्याचे सांगितले. त्याच्याकडे घरासमोर लावलेल्या तीन दुचाकीचे कागदपत्राबाबत विचारपुस करता त्याने दुचाकी या त्याचा साथीदार किरण जाधव( रा. देहरे, ता. नगर) असे दोघांनी चोरी केल्याची माहिती सांगितली. त्याचा राहत्या पत्त्यावर जाऊन शोध घेतला तो मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्यांचे नाव किरण भाऊसाहेब जाधव (वय २४, रा. वांबोरी रोड, देहरे, ता. नगर) असे सांगितले त्याच्याकडे संदीप बर्डे याच्या घरासमोर असलेल्या दुचाकीबाबत विचारपुस करता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांना १ लाख १० हजार रुपये किंमतीची होंडा कंपनीची शाईन, ७० हजार रुपये किंमतीची हिरो कंपनीची एच. डिलक्स मोटार सायकल व ७५ हजार रुपये किंमतीची हिरो एच. डिलक्स मोटार सायकल असा एकूण २ लाख ५५ हजार रुपये किंमतीच्या तीन दुचाकी असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. आरोपींना मुद्देमालासह पारनेर पोलीस ठाण्यात हजर केले आहे. पुढील तपास पारनेर पोलीस करीत आहे.
आरोपी संदीप बबन बर्डे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुध्द अहमदनगर जिल्ह्यात दरोडा तयारी, खुनाचा प्रयत्न, घरफोडी, चोरी, निष्काळजीपणाने मृत्यु व महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गंभीर स्वरुपाचे एकूण ९ गुन्हे दाखल आहेत‌. आरोपी किरण भाऊसाहेब जाधव हा सराईत आहे. याच्याविरुध्द अहमदनगर जिल्ह्यात दरोडा, जबरी चोरी असे गंभीर स्वरुपाचे ३ गुन्हे दाखल आहेत.

तोफखाना पोलीस ठाणे : विवाहितेचा पाठलाग करणाऱ्यावर गुन्हा
Nagar Reporter
अहमदनगर :
विवाहित महिलेचा घरी तसेच कामाच्या ठिकाणी सातत्याने पाठलाग करून तिच्याशी गैरवर्तन केल्याबद्दल आरोपी हर्षल मधुकर जाधव (रा. वाणीनगर, सावेडी) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विवाहितेत महिलेला हर्षल जाधव हा सातत्याने फोन करत होता. या महिलेने त्याच्या फोनकडे दुर्लक्ष केले. संबंधित महिला शनिवारी (ता. २२) दुपारी २ वादता तपोवन रस्त्याने येत होती. त्यावेळेस हर्षल याने या महिलेकडे विवाह करण्याची मागणी केली. तिच्याशी गैरवर्तन केले. आपल्याशी लग्न न केल्यास आत्महत्या करण्याची धमकी दिली. या महिलेने त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तो महिलेच्या सासरी गेला. तेथे ही लग्नाचा विषय काढला. या महिलेने हा प्रकार भावाला सांगितला. घरातील नातेवाईकांनी ठरविल्यानंतर तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपी हर्षल जाधव याच्याविरूद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तोफखाना पोलीस ठाणे: महिलेला मारहाणः चौघांविरूद्ध गुन्हा
Nagar Reporter
अहमदनगर :
चौघांनी महिलेला लाकडाने मारहाण करून जखमी केले. उषा बबन नवले (वय ५२, रा. रेणुकानगर, छत्रपती संभाजीनगर रोड) असे जखमी महिलेचे नाव आहे. छत्रपती संभाजीनगर रोडवरील रेणुकानगरमध्ये बुधवारी (ता. २६) सायंकाळी ही घटना घडली.
जखमी उषा नवले यांनी गुरूवारी (ता. २७) तोफखाना पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी लखन आल्हाट, सोनी आल्हाट (पूर्ण नावे माहिती नाही, दोघे रा. घोडेगाव, ता. नेवासे, हल्ली रा. रेणुकानगर, छत्रपती संभाजीनगर रोड) व दोन अनोळखी अशा चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उषा नवले बुधवारी सायंकाळी रेणुकानगरमधील काळुबाई मंदिराजवळ शेळ्यांना घास चारीत असताना किरण अवसरकर यांच्या तेथे भाड्याने राहणारे लखन आल्हाट, सोनी आल्हाट व दोन अनोळखी यांनी उषा नवले यांना लाकडाने मारहाण करून जखमी केले. शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली. जखमी उषा यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोतवाली पोलिस ठाणे: महिलेचा विनयभंग करणारा जेरबंद

Nagar Reporter
अहमदनगर :
घरात घुसून महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपी तरुणाला कोतवाली पोलिसांनी काही तासांतच अटक केली आहे. कैलास नाना लोंढे (वय २५, रा. संजयनगर, काटवन खंडोबा, अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

विवाहित महिला घरात होती. सासू या बाहेर गेल्या होत्या. महिला घरात झोपी असताना कैलास लोंढे हा घुसला व घरातील लाईट बंद केली. महिलेशी गैरवर्तन करताच तिने आरडोओरड केली. दरम्यान महिलेची सासू आवाज ऐकून आली. त्यावेळी आरोपी कैलास लोंढे महिलेला जोरात भिंतीवर ढकलून पळून गेला. पीडित महिलेने आरोपी विरोधात दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ आरोपीला अटक करण्याचे आदेश पथकाला दिले होते. पोलिस अंमलदार गणेश धोत्रे, योगेश भिंगरदिवे, अमोल गाडे, सोमनाथ राऊत, देवा थोरात यांनी ही कारवाई केली.

📥📥📥
नाव गोपनीय ठेवण्यात येईल
रोडरोमिओ व टवाळखोरांनी महिला तसेच मुलींकडे वाईट नजरेने पाहिल्यास अथवा गैरवर्तन केल्यास संबंधित महिला किंवा मुलीने कोतवाली पोलिसांशी संपर्क करावा. संबंधित तरुणीचे/महिलेचे नाव पोलिसांकडून गोपनीय ठेवण्यात येईल. छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू असून, अशी कोणतीही घटना घडल्यास संबंधित महिलेने तसेच मुलीने पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,200SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!