भिंगार कॅम्प पोलीस ठाणे : तिरट जुगार जुगारावर छापा, ५ जणांवर कारवाई
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर: तिरट जुगार ‘खेळणा-या पाजजणांवर भिंगार कॅम्प पोलीसांनी कारवाई केली आहे. एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सपोनी दिनकर मुंडे यांनी दिलेल्या सूचनेनुसार पोहेकाँ अजय नगरे, पोहेकाँ बिभीषन दिवटे, पोना राहुल द्वारके, पोना भानुदास खेडकर, पोकाँ अमोल आव्हाड आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सपोनि दिनकर एस. मुंडे यांना माहिती मिळाली कि, नगर सोलापुर रोड, कोंबडीवाला मळा, येथे झाडाखाली उघड्यावर काही लोक तिरट नावाचा हारजीतीचा जुगार खेळत आहे. या माहितीनुसार सपोनि दिनकर एस. मुंडे यांनी पथकासह त्या ठिकाणी जाऊन खात्री केली असता तेथे ठिकाणी अजय रमेश नन्नवरे (वय ५०, रा. कोंबडीवाला मळा, नगर सोलापुर रोड, ता. जि. अहमदनगर), भाऊसाहेब देवराम वाघुले (वय ६३ रा.जिल्हा परिषद शाळेजवळ, नागरदेवळे ता. जि. अहमदनगर), पवित्रम नानू नायर (वय ६७ रा. कॉबडीवाला मळा, नगर सोलापुर रोड, ता. जि. अहमदनगर), अशोक मोहन साबळे (वय ३६ रा. कोंबडीवाला मळा, नगर सोलापुर रोड, ता. जि. अहमदनगर), राजु बबन गजभिव (रा. कोंबडीवाला मळा, नगर सोलापुर रोड, ता. जि. अहमदनगर – फरार) असे तिरट नावाचा हारजितीचा जुगार खेळताना मिळून आले. त्यांचे ताब्यातून रोख रक्कम, मोबाईल, मो सा अशा प्रकारचा एकूण ७० हजार ३१० रू किं चा मुद्देमाल ताब्यात घेऊन त्यांचे विरूद्ध भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भिंगार कॅम्प पोलीस ठाणे : बिंगोजुगार अड्ड्यावर छापा
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : बु-हाणनगररोडशेजारी सुरु असणा-या बिंगो जुगार अड्ड्यावर भिंगार कॅम्प पोलीसांनी छापा टाकला. या कारवाईत एकावर गुन्हा दाखल करून ११ हजार ७६० रू किं बिंगो नावाचा जुगार चालविण्याच्या साहीत्यासह तसेच रोख रक्कम जप्त केली आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सपोनी दिनकर मुंडे यांच्या सूचनेनुसार पोहेकाँ अजय नगरे, पोना राहुल द्वारके, पोना भानुदास खेडकर, पोना गणेश साठे, पोकाँ अमोल आव्हाड आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सपोनि दिनकर एस. मुंडे यांना माहिती मिळाली की, बु-हाणनगर रोडवरील व्हीडीओकॉन कंपनी शेजारी रोडलगत एका पत्र्याचे शेडमध्ये एकजण स्क्रीनवर बिंगो नावाचा हार जीतीचा जुगार लोकांकडून पैसे घेऊन खेळतो व खेळवितो आता गेल्यास मिळून येईल. माहितीनुसार सपोनि मुंडे यांनी टिमसह पंच संबंधित ठिकाणी जाऊन खात्री केली असता त्या ठिकाणी गणेश गोरख गाडेकर (वय ३९ रा. नागेश्वर चौक, नागरदेवळे ता.जि. अहमदनगर) हा लोकांकडून पैसे घेऊन बिंगो नावाचा हारजितीचा जुगार चालविताना मिळून आला. त्याच्या ताब्यातून ११ हजार ७६० रु. किं बिंगो नावाचा जुगार चालविण्याच्या साहीत्यासह तसेच रोख रकमेसह ताब्यात घेऊन त्यांच्याविरूद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.