संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
नगर : अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक रिंगणातून तब्बल १९३ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आता १६ जागांसाठी ३५ उमेदवारांमध्ये लढत होत आहे. व्यापारी मतदारसंघातून सुप्रिया कोतकर व राजेंद्र बोथरा यांची बिनविरोध निवड झाली आहे. ग्रामपंचायत व सेवा संस्था मतदारसंघातील १५ जागांसाठी भाजप व महाविकास आघाडीत सरळ लढत होत आहे. १६ संचालकापैंकी संतोष म्हस्के,. हरिभाऊ कर्डीले व राजेंद्र बोथरा या ३ जणांना पुन्हा संधी मिळाली.
नगर बाजार समितीसाठी दि.२८ एप्रिल रोजी मतदान होत आहे. त्यासाठी १८ जागांसाठी तब्बल २२८ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. १९३ जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. हमाल मापाडी मतदारसंघात एका जागेसाठी २ अर्ज शिल्लक राहिले. जिल्हा बँकेंचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले व माजी सभापती भानुदास कर्डिले यांच्या गटातून निलेश सातपुते यांचा अर्ज दाखल झाला. मात्र किसन सानप यांनी अपक्ष अर्ज ठेवल्याने सातपुते यांची बिनविरोध निवड हुकली. महाविकास आघाडीने केवळ सेवा संस्था व ग्रामपंचायत विभागातील १५ जागांसाठीच उमेदवार दिल्याने आता या जागांसाठी भाजप व महाविकास आघाडीत काट्याची लढाई होणार आहे. महाविकास आघाडीकडून प्रा. शशिकांत गाडे, घनशाम शेलार, प्रताप शेळके यांनी एकत्रित बसून उमेदवार निश्चित केले. आमदार निलेश लंके यांचीही सारखे फोन सुरू होते. तर कर्डिले गटाकडुन स्वतः कर्डिले व कोतकर यांनी उमेदवार फायनल केले. भाजपच्या कर्डिले गटाचे उमेदवारात व्यापारी सुप्रिया कोतकर, राजेंद्र बोथरा (बिनविरोध), मापाडी : नीलेश सातपुते, सोसायटी : (सर्वसाधारण) संजय गिरवले, सुधीर भापकर, राजेंद्र आंबेकर, रभाजी सूळ, मधुकर मगर, भाऊसाहेब भोर, सुभाष निमसे, महिला राखीव : आचल सोनवणे, मनीषा घोरपडे, एनटी धर्मनाथ
आव्हाड, ओबीसी : संतोष म्हस्के,
📥ग्रामपंचायत (सर्वसाधारण), भाऊसाहेब बोठे, हरिभाऊ कर्डिले, दत्ता तापकीर (दुर्बल घटक), भाऊसाहेब ठोंबरे (अनुसूचित जाती) तर महाविकास आघाडीचे उमेदवारात सेवा संस्था (सर्वसाधारण) : उद्धव दुसुंगे, संदेश कार्ले, रोहिदास कर्डिले, रा. वी. शिंदे, अजय लामखडे, संपतराव म्हस्के, भाऊसाहेब काळे, महिला राखीव : राजश्री लांडगे, संगीता ठोंबरे, एनटी : विठ्ठल पालवे, ओबीसी : शरद झोडगे,
📥ग्रामपंचायत (सर्वसाधारण), अंकुश शेळके, शरद पवार, प्रवीण गोरे (दुर्बल घटक), सुरेखा गायकवाड (अ. जा.) यांचा समावेश आहे.