अहमदनगर एलसीबी : ४ सराईत गुन्हेगारांच्या टोळी पकडण्यात नगर एलसीबी टिम’ला यश

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर
: श्रीगोंदा तालुक्यातील आरणगांव दुमाला, बेलवंडी येथील शेत वस्तीवरील घरामध्ये घुसून जिवे ठार मारुन जबरी चोरी करणा-या ४ सराईत गुन्हेगारांच्या टोळी पकडण्यात अहमदनगर एलसीबी टिम’ला यश आले आहे.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे व कर्जत डिवायएसपी आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोनि अनिल कटके यांनी दिलेल्या सुचनेनुसार एलसीबीचे सपोनि गणेश वारुळे, पोसई सोपान गोरे, पोहेकॉ सुनिल चव्हाण, बबन मखरे, दत्तात्रय हिंगडे, संदीप पवार, बापुसाहेब फोलाणे, देवेंद्र शेलार, पोना ज्ञानेश्वर शिंदे, शंकर चौधरी, भिमराज खर्से, रवि सोनटक्के, पोकॉ विनोद मासाळकर, योगेश सातपुते, मच्छिंद्र बर्डे, मेघराज कोल्हे व चापोहेकॉ चंद्रकांत कुसळकर व चापोना भरत बुधवंत आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली.


याबाबत समजलेली माहिती अशी की, कुंटुंबियासह घरात झोपलेले होते. यावेळी अनोळखी चारजण येऊन घराचा दरवाजा कशाने तरी उघडून घरात प्रवेश केला. यात केबल व हत्याराचा धाक दाखवून घरातील सामानाची उचकापाचक करुन सोन्याचे दागिने व रोख रक्कम बळजबरीने चोरी करुन जात असताना पती कल्याण गायकवाड यांनी आरोपींना विरोध करताच त्यांच्या डोक्यात हत्याराने मारहाण करुन जिवे ठार मारले, आणि १५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख चोरुन घेऊन गेले, या श्रीमती. शर्मिला कल्याण गायकवाड (रा. आरणगांवदुमाला, बेलवंडी, ता. श्रीगोंदा) यांच्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलीस ठाण्यात गु.र.नं. ८३/२०२३ भादविक ३९४,३०२ प्रमाणे खुनासह जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन एसपी राकेश ओला यांनी घटना ठिकाणास भेट देऊन एलसीबी पोनि अनिल कटके यांना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची पथके नेमून गुन्ह्याचा ४समातंर तपास करुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेश दिले.
आदेशान्वये पोनि श्री. कटके यांनी एलसीबी टिम’ तयार करुन कारवाई करण्यासाठी रवाना केली.
एलसीबी टिम’चे अधिकारी व अंमलदार गुन्ह्याचा श्रीगोंदा व बेलवंडी परिसरात फिरुन आरोपीची माहिती घेऊन समांतर तपास करीत असताना पोनि श्री कटके यांना माहिती मिळाली की, गुन्हा हा रांजणगांव मशिद (ता. पारनेर) येथील आरोपी निमकर काळे याने त्याचे इतर साथीदारांसह केला आहे. ते जुना टोलनाका, तळेगांव दाभाडे (जि. पुणे) येथे पळून गेले आहेत‌. ही माहिती पोनि श्री कटके यांनी एलसीबी टिम’ला दिली. तसेच कर्जत डिवायएसपी कार्यालयातील सफौ अंकुश ढवळे व बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोसई श्री चाटे, पोकॉ विनोद पवार व पंचासोबत घेऊन तात्काळ प्राप्त माहिती प्रमाणे तळेगांव दाभाडे, पुणे येथे जाऊन खात्री करुन कारवाई करण्यासाठी आदेश दिले व तात्काळ रवाना केले.
टिम’तील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तळेगांव दाभाडे येथे जाऊन दोन दिवस मुक्काम तसेच वेशांतर करुन टोलनाका परिसरात आरोपीचे वास्तव्याबाबत माहिती घेता, माहितीप्रमाणे संशयीत व त्याचे इतर साथीदार टोलनाका परिसरात फिरतांना दिसले. पथक संशयीतांना शिताफीने ताब्यात घेण्याचे तयारीत असताना संशयीतांना पोलीस पथकाची चाहुल लागताच ते पळून जात असताना एलसीबी टिम’तील अधिकारी व अंमलदार यांनी त्यांचा पाठलाग करुन त्यांना शिताफीने ताब्यात घेतले. तीन संशयीत डोंगर व झाडाझुडपाचा फायदा घेऊन पळून गेले, त्यांचा पोलिसांनी शोध घेतला परंतु ते मिळून आले नाही. ताब्यात घेतलेल्या संशयीतांना पोलीस पथकाची ओळख सांगून त्यांना त्यांचे नाव व पत्ते विचारले असता त्यांनी त्यांची नावे निमकर अर्जुन काळे (वय २१, रा. रांजणगांव मशिद, ता. पारनेर), शेखर उदास भोसले (वय २०, रा. कोळगांव, ता. श्रीगोंदा), अतुल उदास भोसले (वय १९, रा. कोळगांव, ता. श्रीगोंदा) व एक विधीसंघर्षीत बालक असे असल्याचे सांगितले. ताब्यातील ४ संशयीताकडे गुन्ह्याबाबत विचारपुस करता सुरुवातीस ते समाधानकारक उत्तरे न देता उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. त्याना पोलिस खाक्या दाखविताच त्यांनी त्यांचे साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिल्याने चारही आरोपींना ताब्यात घेतले.
ताब्यातील आरोपींना विश्वासात घेऊन अहमदनगर जिल्ह्यात आणखी किती ठिकाणी व कोठे कोठे गुन्हे केली आहे. याबाबत विचारपुस केली असता आरोपींनी रायगव्हाण (ता. श्रीगोंदा) व पारनेर तालुक्यातील वडनेर हवेली व राळेगणथेरपाळ येथे घरात प्रवेश करुन मारहाण करुन चोरी केल्याची कबुली दिल्याने अहमदनगर जिल्हा गुन्हे अभिलेख पडताळणी करता खालील प्रमाणे जबरी चोरीचे गुन्हे दाखल असल्याबाबत माहिती प्राप्त झाली आहे.
पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम बेलवंडी 86/2023 भादविक 397, सुपा 56/2023 भादविक 397, 34, पारनेर 160/2023 भादविक 458, 469, 427, 380 ही माहिती प्राप्त झाल्याने चारही आरोपींना बेलवंडी पोलीस स्टेशन येथे हजर केले पुढील तपास बेलवंडी पोलीस करीत आहे.
आरोपी निमकर काळे हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द अहमदनगर जिल्ह्यात दरोडा, दरोडा तयारी, जबरी चोरी, चोरी व घरफोडी असे गंभीर स्वरुपाचे एकुण १२ गुन्हे दाखल आहेत.आरोपींच्या फरार साथीदारांचा शोध घेत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,300SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!