संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
शेवगाव: तालुक्यातील चापडगांव येथील दोन जुगार अड्डयांवर छापे टाकून जुगार खेळणा-या १५ जणांना रोख रक्कम व ९ दुचाकी असा एकूण ३ लाख ९७ हजार ३० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्याची मोठी कारवाई अहमदनगर एलसीबी टिम’ने केली आहे.
एसपी राकेश ओला, अहमदनगर अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, श्रीरामपूर तथा अतिरिक्त प्रभारी शेवगांव डिवायएसपी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर एलसीबीचे पोनि अनिल कटके यांच्या सूचनेनुसार एलसीबीचे पोसई सोपान गोरे, पोहेकॉ संदीप पवार, सुरेश माळी, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, पोना शंकर चौधरी, भिमराज खर्से, पोकॉ विनोद मासाळकर, सागर ससाणे, रोहित येमुल व चापोहेकॉ संभाजी कोतकर आदिंच्या टिमने ही कारवाई केली आहे.
या कारवाईत याबाबत समजलेली माहिती अशी की, शेवगांव येथे चापडगांव ते गदेवाडी रोडच्या बाजूला दोन वेगवेगळ्या ठिकाणी अजय पातकरळ व मच्छिंद्र धनवडे हे पत्र्याचे शेडमध्ये काहीजणांना घेऊन तिरट नावाचा हारजीतीचा जुगार पैसे लावुन खेळत आहे, अशी खात्रीशीर माहिती एलसीबी पोनि अनिल कटके यांना मिळाली होती. ही माहिती एलसीबी टिम’ला देऊन कारवाईच्या सूचना दिल्या.
एलसीबी टिम’ने शेवगांव येथील चापडगांव ते गदेवाडी रोडवर जाऊन पाहणी करता दोन पत्र्याचे शेड बाहेर दुचाकी उभ्या दिसल्या. पत्र्याचे शेडजवळ जाऊन खात्री करता काहीजण गोलाकार बसुन हातामध्ये पत्ते घेऊन पैशावर हारजीतीचा तिरट जुगार खेळतांना दिसले. पथकाची व पंचाची खात्री होताच एकाच वेळी अचानक छापा टाकला. तेथे बसलेल्यांना एलसीबी टिम’ व पंचाची ओळख सांगून त्यांचे नाव गांव विचारले असता पत्र्याचे पहिल्या शेडमध्ये बसलेल्यांनी त्यांची नावे अजय श्रीधर पातकळ ( वय ४५, रा. चापडगांव, ता. शेवगांव), भगवान आण्णासाहेब वरकटे (वय ४७, रा. चांगदपुरी, ता. पैठण, जि. औरगाबाद), लियाकत रज्जाक शेख (वय ३४, रा. बोधेगांव, ता. शेवगांव), पांडुरंग भिमराव पातकळ (वय ५३, रा. चापडगांव, ता. शेवगांव), आण्णासाहेब उत्तम केदार (वय २३, रा. मंगरुळ, ता. शेवगांव), नवाब कदीर शेख (वय ४२, रा. चापडगांव, ता. शेवगांव), शहादेव लक्ष्मण मांतग (वय ५९, रा. हातगांव, ता. शेवगांव), लक्ष्मण रावसाहेब नेवल (वय ४७, रा. गदेवाडी, ता. शेवगांव), एजाज दगडु सय्यद (वय २४, रा. बोधेगांव, ता. शेवगांव) असे सांगितले.
तसेच पत्र्याच्या दुस-या शेडमध्ये बसलेल्यांनी विनोद दत्तात्रय नेमाणे (वय ३०, रा. चापडगांव, ता. शेवगांव), बाळासाहेब बाबुराव फुंदे (वय२७, रा. प्रभुवाडगांव, ता. शेवगांव), पांडुरंग गणपत बटुळे (वय ४६, रा. प्रभुवाडगांव, ता. शेवगांव), दिपक राजु पातकळ (वय २३, रा. चापडगांव, ता. शेवगांव), रमेश नागु धनवडे (वय ५८, रा. गदेवाडी, ता. शेवगांव), आसाराम देवराम बटुळे (वय ५७, रा. प्रभुवाडगांव, ता. शेवगांव) असे सांगितले. त्यावेळी दुस-या पत्र्याचे शेडबाहेर उभा असलेला इसम पोलीस पथकाची चाहुल लागताच शेतातील झाडाझुडपांचा फायदा घेऊ पळून गेला, त्याचा शोध घेतल. परंतु तो मिळून आला नाही. त्याचे नाव विचारले असता त्याचे नाव मच्छिंद्र एकनाथ धनवडे (रा. गदेवाडी, ता. शेवगांव) असे असल्याचे सांगितले.
या पकडण्यात आलेल्यांची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्यांचे अंगझडत व कब्जात ७६ हजार ३० रु. रोख रक्कम व ३ लाख २१ हजार रुपये किंमतीच्या ९ वेगवेगळ्या कंपनीच्या दुचाकी व तिरट जुगारीची साधने असा एकूण ३ लाख ९७ हजार ३० रुपये किंमतीची रोख व ९ दुचाकी असा मुद्देमाल मिळून आला. हा सर्व मुद्देमाल जप्त करुन १५ आरोपीविरुध्द एलसीबीचे पोहेकॉ संदीप कचरु पवार यांच्या फिर्यादीवरुन शेवगांव पोलीस ठाण्यात गु.र.नं. २५४/२०२३ महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील कायदेशीर कारवाई शेवगांव पोलीस करीत आहेत.