संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Nagar Reporter
नेवासा : तालुक्यातील सोनई येथे विक्री करण्याच्या उद्देशाने ६ गावठी कट्टे व १२ जिवंत काडतूस जवळ बाळगणा-यास पकडले. त्याच्याकडून १ लाख ५६ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्याची मोठी कामगिरी अहमदनगर एलसीबी टिम’ची केली आहे.
कयामुद्दीन ऊर्फ भैय्या कुतुबूद्दीन शेख ( वय ३४, रा. कुकाणा, ता. नेवासा) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे, अशी माहिती एसपी राकेश ओला यांनी दिली. यावेळी अहमदनगर एलसीबी पोनि अनिल कटके हे उपस्थित होते.
ही कारवाई एलसीबीचे टिमचे सपोनि गणेश वारुळे, पोहेकॉ सुनिल चव्हाण, संदीप पवार, दत्तात्रय हिंगडे, बापु फोलाणे, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, पोना शंकर चौधरी, भिमराज खर्से, रवि सोनटक्के, दिपक शिंदे, पोकॉ विनोद मासाळकर, योगेश सातपुते, रविकिरण सोनटक्के, मेघराज कोल्हे, चापोहेकॉ संभाजी कोतकर व चापोहेकॉ अर्जुन बडे आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली.
एलसीबी टिम’ने शेतकरी, शेतमजुर असे वेशांतर करुन घोडेगांव- चांदा रोड येथे जाऊन सापळा लावला. थांबलेले असताना खात्री होताच टिम’ने संशयीतास ताब्यात घेण्याचे तयारीत असताना तो पळून जाऊ लागला, तोच त्याचा पाठलाग करुन त्यास शिताफीने ताब्यात घेतले. त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव कयामुद्दीन ऊर्फ भैय्या कुतुबूद्दीन शेख (वय ३४, रा. कुकाणा, ता. नेवासा) असे असल्याचे सांगितले. त्याची पंचासमक्ष अंगझडती घेता अंगझडतीत एका राखाडी रंगाचे सॅकमध्ये ६ गावठी बनावटीचे कट्टे व १० जिवंत काडतूस मिळून आल्याने ती जप्त करण्यात आली. हा सर्व मुद्देमाल १ लाख ५६ हजारासह त्याला ताब्यात घेऊन एलसीबी पोहेकाॅ संदीप पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोनई पोलीस ठाण्यात गु.र.नं. १४३/२०२३ आर्म ॲक्ट ३/२५,७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.