संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : जिल्हा पोलीस दलात महत्वाची शाखा असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) निरीक्षकपदी दिनेश आहेर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीने एलसीबीला एक ‘खमक्या’ अधिकारी मिळाला आहे. त्यांनी यापूर्वी बीड एलसीबीची यशस्वी धुरा संभाळली आहे. त्यांच्या कामगिरीवर ‘फिदा’ होत पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी त्यांची नियुक्ती एलसीबीच्या निरीक्षकपदी केली आहे.
दरम्यान बदली होवूनही सोडले न गेलेले निरीक्षक अनिल कटके यांना आता सोडण्यात आले असून त्यांना आता नियंत्रण कक्षात हजर राहण्याचे आदेश काढण्यात आले आहे. त्यांना अजूनही ठेवले जाणार अशी चर्चा चांगलीच झडली होती, मात्र योग्य वेळ येताच अधीक्षक ओला यांनी निरीक्षक कटके यांच्या जागी निरीक्षक आहेर यांना संधी दिली आहे. त्यांच्या रूपाने एलसीबीला ‘दबंग’ अधिकारी मिळाला आहे.