संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : नगर तालुका पोलीस ठाणे हद्दीत अवैध गावठी हातभट्टी ठिकाणांवर पोलिसांचे छापे टाकले. या छाप्यात ५ जणांविरुध्द कारवाई करुन तब्बल २ लाख ४४ हजार ५०० रुपये किंमतीची अवैध गावठी हातभट्टीची साधने ४,५०० लि. कच्चे रसायन व १९५ लि. तयार दारु नष्ट करण्याची कारवाई अहमदनगर एलसीबी टिम’ने केली आहे.
अर्जुन भिवाजी गव्हाणे (वय ५०, रा. वाळुज, ता. नगर), गणेश पोपट गिरे (वय ३०, रा.गिरेवस्ती खंडाळा, ता. नगर), अशोक मच्छिद्र कदम (वय ३६, रा.निंबळक, ता. नगर) युवराज बजरंग गिरे, (वय ३८, रा.खंडाळा, ता. नगर) आणि एक महिला आदिंवर कारवाई करण्यात आली आहे.
वरिष्ठांच्या आदेशानुसार अहमदनगर एलसीबीचे दिनेश आहेर यांनी दिलेल्या सुचनेनुसार एलसीबीचे सफौ भाऊसाहेब काळे, पोहेकॉ विजय वेठेकर, बापुसाहेब फोलाणे, विश्वास बेरड, पोना भिमराज खर्से, मपोना भाग्यश्री भिटे व चापोहेकॉ उमाकांत गावडे आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली आहे.
अहमदनगर एलसीबी: पॅरोल रजेवरुन हजर न होता फरार आरोपी अटक
Nagar Reporter
अहमदनगर : घरफोडी गुन्ह्यात तीन वर्षे शिक्षा झालेला व पॅरोल रजेवरुन हजर न होता एक वर्षापासून फरार असणारा आरोपी पकडण्यात अहमदनगर एलसीबी टिम’ला यश आले आहे. सुरज सुनिल वाल्मिकी ( रा. इंदीरानगर, भिंगार) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार एलसीबी पोनि दिनेश आहेर यांनी दिलेल्या सुचनेनुसार सफौ भाऊसाहेब काळे, पोहेकॉ विजयकुमार वेठेकर, देवेंद्र शेलार व पोना संतोष लोढे यांच्या टिम’ने ही कारवाई केली आहे.