👉कारवाई अहमदनगर एलसीबी टिम’ने केली
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : जिल्ह्यातून हद्दपार असताना आदेशाचा भंग करून आहे, त्याच ठिकाणी मिळून आलेल्या ३ सराईत गुन्हेगारांना पकडण्याची कारवाई अहमदनगर एलसीबी टिम’ने केली आहे. कारवाई करण्यात आलेल्यांची नावे याप्रमाणे सरवर ऊर्फ भिमा अस्लम शेख ( वय ३१, रा. सुभेदार गल्ली, झेंडीगेट, अहमदनगर), अतुल रावसाहेब दातरंगे ( वय २८, रा. टांगेगल्ली, नालेगांव, अहमदनगर), अक्षय भाऊसाहेब मोढवे ( वय २३ रा. सातपुते गल्ली, केडगांव, अहमदनगर).
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, नगर शहर डिवायएसपी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोनि पोनि दिनेश आहेर यांच्या सूचनेनुसार एलसीबीचे सफौ राजेंद्र वाघ, संजय खंडागळे, भाऊसाहेब काळे, पोहेकॉ फकिर शेख, संदीप घोडके, दिनेश मोरे, संदीप पवार, सुरेश माळी, पोना विशाल दळवी, संदीप चव्हाण, दिपक शिंदे, पोकॉ विजय धनेधर, कमलेश पाथरुट आदिंच्या टिम’ने कारवाई केली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, एसपी राकेश ओला यांनी एलसीबीचे पोनि दिनेश आहेर यांना आगामी सण व उत्सव अनुषंगाने अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेल्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांची तपासणी करून हद्दपार गुन्हेगार हद्दपार आदेशाचा भंग करुन अहमदनगर जिल्ह्यामध्ये बेकायदेशिररित्या वास्तव्य करताना मिळून आल्यास कारवाई करा, असे आदेश दिले होते. या आदेशाप्रमाणे पोनि श्री आहेर यांच्या सूचनेनुसार एलसीबी टिम’ने हद्दपार गुन्हेगारांची तपासणी सुरू केली. या दरम्यान अहमदनगर एलसीबी पोनि दिनेश आहेर यांना माहिती मिळाली कि, हद्दपार सरवर ऊर्फ भिमा अस्लम शेख, अतुल रावसाहेब दातरंगे, अक्षय भाऊसाहेब मोढवे हे हद्दपार असताना लपूनछपून अहमदनगर शहरामध्ये वास्तव्य करीत आहेत.अशी खात्रीशीर माहिती मिळाली. एलसीबी टिम’ने हद्दपार असणाऱ्यांचा शोध घेतला असता हद्दपार सरवर ऊर्फ भिमा अस्लम शेख (रा. सुभेदार गल्ली, झेंडीगेट, अहमदनगर), अतुल रावसाहेब दातरंगे ( रा. टांगेगल्ली, नालेगांव, अहमदनगर), अक्षय भाऊसाहेब मोढवे (रा. सातपुते गल्ली, केडगांव, अहमदनगर) हे अहमदनगर शहरात विविध ठिकाणी मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेतले. हद्दपार गुन्हेगारांचे हद्दपार आदेशाबाबत खात्री केली असता, हद्दपार प्राधिकर तथा, पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांचेकडील आदेशान्वये अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेले आहे.
हद्दपार आदेशाचा भंग करुन बेकायदेशीररित्या नगर शहर भागामध्ये वास्तव्य करीत असताना मिळून आले. त्यांच्याविरुध्द कोतवाली पोलिस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. पुढील कार्यवाही कोतवाली पोलिस करीत आहेत.