संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : दुचाकी चोरी करणारा पकडला असून, चोरट्याकडून ७५ हजार रु. किंमतीचे होंडा युनिकॉर्न दुचाकी हस्तगत करण्याची कारवाई अहमदनगर एलसीबी टिम’ने केली आहे. गौरव राजेंद्र धनवटे ( वय २१, रा. गणेशनगर, ता. राहाता, जि.अ.नगर) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
एसपी राकेश ओला, श्रीरामपूर अपर पोलीस अधिक्षक श्रीमती. स्वाती भोर मॅडम व संगमनेर डिवायएसपी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोनि दिनेश आहेर यांच्या सूचनेनुसार एलसीबीचे पोना रविंद्र कर्डीले, संतोष लोढे, ज्ञानेश्वर शिंदे, फुरखान शेख, पोकॉ रोहित येमुल, जालिंदर माने व चापोहेकॉ चंद्रकांत कुसळकर आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली.

याबाबत समजलेली माहिती अशी की, राहत्या घरासमोर लावलेली होंडा कंपनीची युनिकॉर्न दुचाकी अनोळखींनी चोरुन नेली होती, दि.२७ एप्रिलला बाबासाहेब भिकाजी पाटोळे (रा. आश्वी बुा, ता. संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आश्वी पोलीस ठाण्यात गु.र.नं. १०७/२०२३भादविक ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार एलसीबी टिम’ने शिर्डी, राहाता परिसरात फिरुन दुचाकी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींची माहिती घेत असताना पोनि दिनेश आहेर यांना माहिती मिळाली की, शुभम काळे ( गणेश नगर, ता. राहाता) याने साथीदारांचे मदतीने चोरी केलेली होंडा युनिकॉर्न दुचाकी नेवासा फाटा येथे विक्री करण्यासाठी येणार आहे. आता गेल्यास मिळून येईल. ही माहिती पोनि श्री आहेर यांनी एलसीबी टिम’ला दिली. टिम’ने तात्काळ नेवासा फाटा येथील मुकिंदपुर कमानी जवळ रोडच्या बाजूला सापळा लावला. या दरम्यान एकजण होंडा युनिकॉर्न दुचाकीवर येताना दिसला त्यास थांबवून त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव गौरव राजेंद्र धनवटे ( रा. गणेशनगर, ता. राहाता) असे असल्याचे सांगितले. त्याच्याकडे ताब्यातील होंडा युनिकॉर्न दुचाकीबाबत विचारपुस करता त्याने त्याचे साथीदारासह आश्वी बुा येथून दुचाकी चोरी केली असून विक्री करण्यासाठी घेऊन जात आहे. ही माहिती दिल्याने त्यास ७५ हजार रु. किंमतीचे होंडा युनिकॉर्न दुचाकीसह ताब्यात घेऊन आश्वी पोलीस ठाण्यात हजर केले आहे. पुढील तपास आश्वी पोलीस करीत आहे. आरोपीचे इतर साथीदारांचा शोध घेतला परंतु ते मिळून आले नाहीत. पोलिस शोध घेत आहेत.