संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : राहाता तालुक्यातील लोणी परिसरात दरोड्याच्या तयारीत असलेल्या राहात्यातील सराईत ५ जणांची टोळी पोलिसांनी पकडली. या टोळीकडून ५ लाख ५०० रुपये किंमतीची एक सुमो गाडी, एक लोखंडी कोयता, चाकू, स्क्रू ड्रायव्हर व मिरचीपुड अशा साधने जप्त करण्याची कारवाई अहमदनगर एलसीबी टिम’ने केली आहे.
ताब्यातील ही सर्वजण सराईत गुन्हेगार आहेत. तपासात त्याच्याकडून जिल्ह्यातील व राज्यातील मालाविरुध्दचे व डिझेल चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
अजय राजु भोसले (वय २५, रा. साई निर्माण कॉलेजजवळ, कडबा, शिर्डी, ता. राहाता), ऋतुंजय ऊर्फ अमोल अविनाश कुंदे (वय १९, रा. एकरुखे, ता. राहाता), योगेश किशोर कांबळे (वय १९, रा. बाजारतळ, कालीकानगर, शिर्डी, ता. राहाता), साईराम राजु गुडे (वय २३, रा. पिंपळवाडी रोड साईश कॉर्नर, पांडुरंग नगर, शिर्डी, ता. राहाता) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे असून एकजण अल्पवयीन मुलगा आहे. तर फरार झालेल्याचे सतिष बाबासाहेब खरात ( रा. शिर्डी, ता. राहाता) असे नाव आहे.

एसपी राकेश ओला, श्रीरामपूर अपर पोलीस अधिक्षक श्रीमती. स्वाती भोर मॅडम व शिर्डी डिवायएसपी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोनि दिनेश आहेर यांनी दिलेल्या सूचनेनुसार पोसई तुषार धाकराव, पोहेकॉ मनोहर गोसावी, संदीप पवार, पोना रविंद्र कर्डीले, फुरकान शेख, प्रशांत राठोड, संतोष खैरे, पोकॉ आकाश काळे, अमृत आढाव व चापोहेकॉ संभाजी कोतकर आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली आहे.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार अहमदनगर एलसीबी टिम’ शिर्डी, राहाता व लोणी परिसरात फिरुन पाहिजे व फरार आरोपींचा शोध घेत होती. या दरम्यान एलसीबी पोनि दिनेश आहेर यांनी एलसीबी टिम’ला सांगितली की, आताच माहिती मिळाली की, शिर्डी नगर रोडवर, निर्मळपिंप्री येथे ५ ते ६ जण पांढरे रंगाचे सुमो गाडीसह दरोडा घालण्याचे तयारीत रस्त्याचे कडेला अंधारात बसलेले आहे. आता गेल्यास मिळून येईल. या माहितीनुसार एलसीबी टिम’ने त्या ‘ठिकाणी जाऊन वाहन रस्त्याच्या बाजूला लावून पायी चालत बॅटरीचे उजेडात खात्री केली. यावेळी काहीजण अंधारात दबा धरुन बसलेले दिसले. एलसीबी टिम’ची चाहुल लागताच संशयीत पळून जाऊ लागले. एलसीबी टिम’ने त्यांचा पाठलाग करुन ५ जणांना ताब्यात घेतले. त्याच्यापैकी एक संशयित अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला.
ताब्यात घेतलेल्या संशयितांना त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे सांगितली, तसेच फरार झालेल्याचे सांगितले. ताब्यात घेतलेल्यांची अंगझडती घेतली असता त्यांचे अंगझडतीमध्ये एक लोखंडी कोयता, एक चाकू, एक स्क्रुड्रायव्हर, मिरचीपूड व एक पांढरे रंगाची सुमो गाडी असा एकूण ५ लाख ५०० रु. किंमतीचा मुद्देमाल मिळून आला.
या पकडण्यात आलेल्यांविरुध्द लोणी पोलीस ठाण्यात गु.र.नं. २६६ / २०२३ भादविक ३९९, ४०२ सह आर्म ॲक्ट ४/२५ प्रमाणे दरोडा तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.