संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : अहमदनगर शहर व श्रीरामपूर येथील महिलांचे गळ्यातील सोन्याचे दागिने चैन स्नॅचिंग करणारे दोन सराईत चोरट्यांना पकडण्यात आले आहे. या चोरट्यांकडून तब्बल ५५ तोळे (५५ ग्रॅम) वजनाचे सोन्याचे दागिने व एक दुचाकी असा एकूण ४ लाख ३१ हजार रुपये किंमतीचे मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई अहमदनगर एलसीबी टिम’ने केली आहे.
प्रफुल्ल अशोक जाधव (वय २४, रा. निपाणीवडगांव, ता. श्रीरामपूर), विष्णु दत्तात्रय गवारे (वय २५, रा. अशोकनगर, ता. श्रीरामपूर) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे व श्रीरामपूर अपर पोलीस अधिक्षक स्वाती भोर मॅडम व नगर शहर डिवायएसपी अनिल कातकाडे, श्रीरामपूर डिवायएसपी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे सफौ भाऊसाहेब काळे, मनोहर शेजवळ, पोहेकॉ विजय वेठेकर, मनोहर गोसावी, पोना विजय ठोंबरे, सचिन आडबल, शंकर चौधरी, पोकॉ शिवाजी ढाकणे, रणजीत जाधव, मेघराज कोल्हे, आकाश काळे व चापोहेकॉ चंद्रकांत कुसळकर आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, दि. ३० मार्च २०२३ ला रस्त्याने पायी घरी जात असतांना तोंडाला बांधलेले दोन अनोळखी दुचाकीवर जवळ येऊन, गळ्यातील ३० हजार रुपये किंमतीचा सोन्याचा सर ओढन तोडून धक्का देवुन बळजबरीने चोरुन घेवुन गेले होते. सदर घटने बाबत फिर्यादी यांनी तोफखाना पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादी वरुन तोफखाना पोलीस स्टेशन गु.र.नं. 358/2023 भादविक 392, 34 प्रमाणे चैन स्नॅचिंग जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटना घडल्यानंतर एसपी राकेश ओला यांनी एलसीबी पोनि दिनेश आहेर यांना ना उघड गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पथक नेमून समांतर तपास करुन कारवाई करण्याबाबत बाबत आदेश दिले होते.

आदेशाप्रमाणे एलसीबी पोनि श्री. आहेर यांनी एलसीबी टिम पथक नेमून ना उघड गुन्ह्यातील आरोपींची माहिती व शोध घेण्याबाबत सूचना देऊन टिमला रवाना केले.
एलसीबी टिम’ने श्रीरामपूर परिसरात फिरुन ना उघड गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना एलसीबी पोनि श्री.आहेर यांना माहिती मिळाली की, कुणाल जाधव व मनोज जामदार यांनी अहमदनगर शहर व श्रीरामपूर परिसरात चैन स्नॅचिंग करुन चोरी केलेले महिलांचे गळ्यातील सोन्याची दागिने प्रफुल्ल जाधव व विष्णु गवारे यांच्याकडे आहे. ते विक्री करण्यासाठी अशोकनगर येथून श्रीरामपूरकडे येणार आहे. आता गेल्यास मिळून येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि श्री. आहेर यांनी माहिती पथकास कळवून, पंचाचासोबत घेऊन खात्री करुन कारवाई करणे बाबत सूचना दिल्या. एलसीबी टिम’ने निपाणी फाटा, अशोननगर येथे जाऊन सापळा लावून थांबलेले असताना माहिती प्रमाणे दोघे शाईन दुचाकीवरुन येताना दिसले. पथकाची खात्री होताच त्यांना हात दाखवून थांबण्याचा इशारा करुन थांबविले व पोलीस पथकाची ओळख सांगून त्यांना त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव प्रफुल्ल अशोक जाधव ( निपाणीवडगांव, ता. श्रीरामपूर), विष्णु दत्तात्रय गवारे ( रा. अशोकनगर, ता. श्रीरामपूर) असे असल्याचे सांगितले. त्यांची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्यांचे कब्जात सोन्याचे दागिने व एक दुचाकी मिळून आली. त्याबाबत ताब्यातील घेतलेल्यांकडे विचारपुस करता त्यांनी अहमदनगर व श्रीरामपूर परिसरात इतर साथीदारासह चैन स्नॅचिंग करुन चोरी केलेले सोने विक्री करण्यासाठी आणल्याचे माहिती दिली. त्यावरुन अहमदनगर जिल्हा गुन्हे अभिलेख पडताळणी करता खालील प्रमाणे गुन्हे दाखल असले बाबत खात्री केली असता चार गुन्हे उघडकिस आले आहेत.
आरोपीने दिलेल्या कबुली अनुषंगाने अहमदनगर जिल्हा गुन्हे अभिलेख तपासले असता खालील प्रमाणे एकुण ४ दाखल गुन्हे उघडकिस आले आहेत. चार गुन्ह्यात चोरीस गेलेले 3,21,000/- 5.5 ग्रॅम (55 ग्रॅम) वजनाचे सोन्याचे दागिने, 1,10,000/- रुपये किंमतीची शाईन मोटार सायकल असा एकुण 4,31,000/- (चार लाख एकतीस हजार) रुपये किंमतीचा मुद्देमाल आरोपींचे ताब्यात मिळुन आल्याने त्यांना तोफखाना पोलीस स्टेशन गु.र.नं. 358/2023 भादविक 392, 34 या गुन्ह्यात पुढील कायदेशिर कारवाई करीता हजर केले आहे. पुढील कारवाई तोफखाना पोलीस स्टेशन करीत आहे. आरोपींचे इतर दोन साथीदारांचा त्यांचे पत्त्यावर जाऊन शोध घेतला परंतु ते मिळून आले नाहीत. आरोपी प्रफुल्ल अशोक जाधव हा सराईत गुन्हेगार असुन त्यांच्या विरुध्द अहमदनगर व औरंगाबाद जिल्ह्यात दरोडा तयारी, जबरी चोरी व चोरी असे गंभीर स्वरुपाचे एकुण ८ गुन्हे दाखल आहेत. आरोपी दत्तात्रय ऊर्फ बिंग्या विष्णु गवारे हा सराईत गुन्हेगार असुन त्यांच्याविरुध्द अहमदनगर व औरंगाबाद जिल्ह्यात दरोडा तयारी, जबरी चोरी व चोरी असे गंभीर स्वरुपाचे एकुण ७ गुन्हे दाखल आहेत.