संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर – सुपे सावरगाव या ठिकाणी भगवानबाबांच्या जन्मगावी बाबांच्या मंदिर स्थळी दसरा मेळावा होणार आहे. या मेळाव्यास अहमदनगर जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने भगवानबाबा भक्त तथा सर्व समाज बांधव जाणार आहेत. या नियोजनासाठी अहमदनगर -संभाजीनगर महामार्गावरील शासकीय विश्रामगृह येथे शनिवारी (दि.१) बैठक झाली. बैठकीत सुपे सावरगाव दसरा मेळाव्यास जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहनही यावेळी बैठकीत नेत्यांनी केले.
यावेळी बैठकीस कैलास गर्जे, नितीन शेलार, आनंद लहामगे, अशोक दहिफळे, बंटी ढापसे, शिवाजी गर्जे, रोहित सानप, सतीष ढाकणे, प्रदीप घोडके, राहुल आंधळे, प्रकाश पालवे, आकाश ढाकणे, रोहण कुटे, सोमनाथ चौधर, कुमार बांगर, विनायक चौधर, राजू गीते, अशोक प्रशांत, जगधने, आजिनाथ लटपटे, विनायक सानप, शिवप्रसाद पालवे, सौरभ कैदके, प्रताप बटुळे, राहुल गीते, सतीष कीर्तने, शिवाजी पालवे आदिंसह सर्वच समाजातील भाविक-कार्यकर्ते उपस्थित होते.