👉एमआयडीसीच्या मपोउपनि ज्योती डोके यांची कामगिरी
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर – शहराच्या एमआयडीसी परिसरात असलेल्या वडगाव गुप्ता शिवारातील दुध डेअरी चौक येथून १० वीमध्ये शिक्षण घेणाऱ्या एका १६ वर्षिय युवतीला फुस लावून राहत्या घरातून पळवून नेणाऱ्या आरोपीला एमआयडीसी मि पोलिसांच्या पथकाने शिर्डी येथे पकडले आहे. शि शुभम शरद गायकवाड (रा.बोल्हेगाव) असे त्य आरोपीचे नाव असून त्याला न्यायालयाने दि.८ एप्रिल पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
एसपी राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, नगर ग्रामीण डिवायएसपी अजित पाटील, एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सपोनि राजेंद्र सानप यांच्या मार्गदर्शनाखाली मपोउपनि ज्योती डोके, पोलीस अंमलदार नवनाथ दहिफळे, किशोर जाधव आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, १६ वर्षीय तरुणीला फुस लावून राहत्या घरातून पळवून नेल्याची घटना वडगावगुप्ता शिवारातील दुध डेअरी चौक परिसरात शनिवारी (दि. १) रात्री ११.४५ वाजण्याच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी सदरील युवतीच्या आईने एमआयडीसी पोलिस ठाण्यात येवून फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्ती विरोधात भा.दं.वि.क. ३६३, ३६६ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याच्या तपासासाठी स.पो. नि. राजेंद्र
सानप यांनी महिला पोलिस उपनिरीक्षक ज्योती डोके, पो.कॉ. नवनाथ दहिफळे, किशोर जाधव यांचे पथक तयार केले, उपनिरीक्षक ज्योती डोके – यांनी अथक परिश्रम करून कसलाही पुरावा मिळून येत नसताना गोपनीय माहिती मिळवून शिर्डी येथून आरोपी शुभम शरद गायकवाड यास त्या युवतीसह ताब्यात घेतले. त्या दोघांना नगरला आणून युवतीला तिच्या पालकांच्या ताब्यात दिले. सदर आरोपी शुभम शरद गायकवाड यास गुरुवारी (दि.६) न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास दि. ८ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.