अहमदनगरला तीन हुक्का पार्लरवर एलसीबीचे छापे ; १६ आरोपींना अटक

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर-
सावेडी व एमआयडीसी परिसरामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी (दि. २४) पहाटेपर्यंत रात्रीत तीन हुक्का पार्लरवर धाडसत्र राबवून १६ आरोपींना अटक केली.‌ या कारवाईत ४६ हजार २०० रु. किं.चा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील, शहर उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, सपोनि दिनकर मुंडे ,पोउपनि सोपान गोरे ,पोहेकॉ संदीप कचरू पवार, पोहेकॉ बापूसाहेब फोलाने, पोहेकॉ सुनिल चव्हाण , पोहेकॉ दिनेश मोरे, पोना शंकर चौधरी, पोना लक्ष्मण खोकले, पोना सचिन आडबल पोना संतोष लोढे , पोना रविकिरण सोनटक्के, पोना भिमराज खर्से,पोकॉ योगेश सातपुते, पोकॉ रोहित मिसाळ, पोकॉ शिवाजी ढाकणे पोकॉ रोहित येमुल आदिंच्या पथकाने ही कारवाई केली.


याबाबत समजलेली माहिती अशी की, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना माहिती मिळाली की , तोफखाना, एम आय डी.सी पोलीस ठाणे हद्दीमध्ये शासनाने बंदी घातलेले तंबाखुजन्य पदार्थ बाळगून हुक्का पार्लर चालवत आहेत. आता गेल्यास लगेच मिळून येतील., अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अनिल कटके यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी तात्काळ एक पथक तयार केले पथकाने शनिवारी (दि.२४) पहाटेपर्यंत रात्रीत तीन हुक्का पार्लरवर धाडसत्र राबवून १६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पहिली कारवाई तोफखाना पोलीस ठाणे गुरनं ८२६/२०२२ राजु भागेश्वर रॉय हा सावेडी या सुवारीत शासनाने बंदी घातलेले तंबाखुजन्य पदार्थ स्वतःकडे बाळगून हुक्का पार्लर चालवत आहे. तेथे जाऊन खात्री केली, त्या ठिकाणी हॉटेल पंचशिलमध्ये एका टेबलवर तीनजण टेबलवर हुक्का पिण्यासाठी लागणारे पॉटने हुक्का पिताना दिसले. एकजण हुक्याचे साहित्य पुरविताना दिसला. ९.१५ वा छापा टाकला, या छाप्यामध्ये बसण्यास सांगून त्यांना त्यांची नाव पत्ते विचारता त्यांनी त्यांची नावे राजु भागेश्वर रॉय (वय २३ , रा . हॉटेल पंचशिल , सावेडी नाक्या जवळ, सावेडी , अ.नगर ), आयुष भिम भटराय (वय २१. रा . दातरंगे मळा , अनगर), साकिब आरीफ शेख (वय १ ९ , रा . मुकुंदनगर , अ.नगर ), आझम आझीम शेख (वय १९ , रा . मुकुंदनगर , अ.नगर) असे असल्याचे सांगितले व राजु भागेश्वर रॉय याने हॉटेलमध्ये हुक्का पार्लर मी स्वतः चालवत असल्याचे सांगितल्याने त्यास हुक्का पार्लर चालविण्याचा परवाण्याबाबत विचारपुस करता त्याने कुठल्याही प्रकारचा परवाना नसल्याचे सांगितले. या ठिकाणी टेबलवर हुक्का पिण्यासाठी लागणारा काचेचा पॉट व हुक्यासाठी लागणारे फ्लेवर व हुक्याचे इतर साहीत्य मिळून आले. अंदाजे १६ हजार ३००रु.चे. दुसरी कारवाई तोफखाना ठाणे गु.र.नं. ८२५/२०२२ जसविन राकेश पहजा हा विराम हॉटेल शेजारी, कुष्टधाम रोड, सावेडी, अ.नगर ता जि. अ.नगर येथे पत्राशेडमध्ये सार्वजनीकरित्या मानवी जिवीतस धोका निर्माण होईल असा शासनाने बंदी घातलेले तंबाखूजन्य पदार्थ स्वतःकडे बाळगून हुक्का पार्लर चालवीत होता. हॉटेल विराज शेजारीच पत्राशेडमध्ये दोन टेबलवर काहीजण टेबलवर हुक्का पिण्यासाठी लागणारे पाँटने हुक्का पिताना दिसले. एकजण हुक्याचे साहित्य पुरविताना दिसला . ठिक ९ .३० वा छापा टाकला, यात जसविन राकेश पहुजा (वय २४ , रा . गुलमोहर रोड , रिध्दी सिध्दी कॉलनी , सावेडी अ.नगर ), ऋषीकेश सतीश हिंगे (वय २१ , रा. भुतकरवाडी , अ.नगर ता. जि. अ.नगर), अक्षय नाना शिंदे (वय २२ , रा. सारसनगर , अ.नगर ), आकाश डॅनिअल पाटोळे (वय २२, रा . डीवाला मळा , सोलापुररोड , अ.नगर), ऋषी मनिष छजलानी (वय २०, रा . पोलीस लाईन जवळ , भिंगार, ता.जि . अ.नगर), हर्षल रणजीत बैराट (वय २१, रा नेहरू कॉलनी भिंगार, ता जि. अ.नगर), नितीन राजु मोरे (वय ३३ , रा. वाणीनगर , पाईपलाईन रोड, अ.नगर), सागर पन्ना काळे (वय ३२ , रा . धानोरे ता आष्टी , जि. बीड), किरण कुमार काळे (वय २४ , रा . नालेगाव अ.नगर), भैरवनाथ बबन धिवर (वय ३९ , रा . सावेडी तलाठी ऑफिसजवळ , अ.नगर) असे असल्याचे सांगितले व जसविन राकेश पहुजा याने हुक्का पार्लर मी स्वतः चालवत असल्याचे सांगितल्याने त्याला हुक्का पार्लर चालविण्याचा परवाण्याबाबत विचारपुस करता त्याने कुठल्याही प्रकारचा परवाना नसल्याबाबत सांगितले.

ठिकाणी टेबलवर हुक्का पिण्यासाठी लागणारा काचेचा पॉट व हुक्यासाठी लागणारे फ्लेवर व हुक्याचे इतर साहीत्य मिळुन आले त्याचे वर्णन खालील वापरलेला अंदाजे १९ हजार ४५० रु., स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तिसरी कारवाई एमआयडीसी ठाणे गुरुनं ७३६ / २०२२ शिवाजी संतराम गांगर्डे हे नगर मनमाड रोड , विळद घाट , अ.नगर येथे हॉटेल द किंग कॅफेमध्ये एका टेबलवर एकजण टेबलवर हुक्का पिण्यासाठी लागणारे पॉटने हुक्का पिताना दिसला व एकजण हुक्याचे साहित्य पुरविताना दिसला. तेथे १० वा छापा टाकून छाप्यात शिवाजी संतराम गांगर्डे (वय ५६ , रा . दत्तनगर , शेडी बायपास चौक , एम आय डी सी . वडगाव गुप्ता ता . जि . अनगर), दिनेश ज्ञानेश्वर मिसाळ ( वय २५ , रा . रेणुकानगर , बोल्हेगाव फाटा , अ.नगर) असे असल्याचे सांगितले व शिवाजी संतराम गांगर्डे याने हॉटेल मध्ये हुक्का पार्लर मी स्वतः चालवत असल्याचे सांगितल्याने त्याला हुक्का पार्लर चालविण्याचा परवाण्याबाबत विचारपुस करता त्याने कुठल्याही प्रकारचा परवाना नसल्याचे सांगितले ठिकाणी टेबलवर हुक्का पिण्यासाठी लागणारा काचेचा पॉट व हुक्यासाठी लागणारे फ्लेवर व हुक्याचे इतर साहीत्य मिळून आले अंदाजे किंमत १८ हजार ४५० रु. या छाप्यात १६ आरोपीविरुध्द सिगारेट व तंबाखु उत्पादने ( जाहीरातीस प्रतिबंध आणि व्यापारी व वाणीज्य व्यवहार , उत्पादन पुरवठा व वितरण याचे विनिमय ) अधिनियम २००३ चा सुधारीत अधिनियम २०१८ कलम ४ व २१ ( १ ) प्रमाणे फिर्याद दाखल करून आरोपींना अटक करण्यात आले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!