👉आनंद संघ तीर्थयात्रा संघातर्फे उपक्रम
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Network
अहमदनगर- आनंद संघ तीर्थयात्रा संघाच्या वतीने राजस्थान -गुजरात या महामार्गावरील तीर्थस्थानांचे दर्शनासाठी नगर मधील ३०० भाविक रवाना झाले आहेत.
प.पु.तारकऋषीजी महाराज वं सुयोगमुनीजी महाराज यांनी मंगल संदेश देऊन या यात्रेचा प्रारंभ करून शुभेच्छा दिल्या झाला.सुमारे ३०० भाविक स्त्री-पुरुष या यात्रे मध्ये सहभागी झाले आहेत. या यात्रेमध्ये भाविकांना वाणी, कमरेज, सरदार सरोवर, मनिलक्ष्मी पार्श्वनाथ, भिनमाल, नाकोडाजी, रामदेवरा, ओशियाजी, भडोर, भुबळमाता, आशापुरा सोनाजीखेतलाझी, मुच्छला , महावीर, रानकपूर, केशरियाजी या २४ तीर्थक्षेत्रांना भेट देऊन दर्शनाच लाभ मिळणार आहे. अनेक वर्षांपासून केवळ भाविकांना तीर्थस्थानांचे दर्शन व्हावे, यासाठी नगरमधील या संघाचे पदाधिकरी ना-नफा-ना-तोटा या तत्वावर सर्वश्री ईश्वर धोका, राजेश बोरा, मनोज व सुधीर बाफना, धनेश कोठारी, राजू मेहेर, निलेश ताथेड, राहुल सुराणा हे या यात्रेचे नियोजन करत असतात. १० दिवसाची ही यात्रा असून निवास, भोजनव्यवस्था, वैद्यकीय सेवा, स्वच्छ पाण्याची व्यवस्था संघातर्फे केली जाते. हे सर्व पदाधिकारी देखील या यात्रेमध्ये दरवर्षी सहभागी होतात.
संकलन: अनिल शहा (प्रेसफोटोग्राफर)