संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर :- अहमदनगरचे नूतन जिल्हाधिकारी म्हणून सिद्धाराम सालीमठ यांनी मावळते जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांच्याकडून आज दि.15 फेब्रुवारी रोजी पदभार स्वीकारला.
महाराष्ट्र शासन राज्य सेवेत उपजिल्हाधिकारी म्हणून सिद्धाराम सालीमठ सन १९९५ मध्ये रुजू झाले असून सिंधुदुर्गमध्ये प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी म्हणून कामकाज पाहिले. कोकण विभागात कणकवली, सावंतवाडी, जव्हार, पालघर येथेही उपविभागीय अधिकारी पदाची धुरा सांभाळली आहे. श्री. सालीमठ यांनी सोलापूर जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणूनही काम पाहिले आहे. श्री. सालीमठ यांनी मंत्रालयातील नगरविकास विभाग, महसूल विभागमध्येही जबाबदारी सांभाळन्याबरोबरच कोकण विभागाचे महसूल उपायुक्त म्हणून देखील त्यांनी कामकाज पाहिले.
भारतीय प्रशासकीय सेवेत सन २०२० मध्ये निवड झाल्यावर प्रथम ते पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते.