संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
कर्जत – तालुक्यातील मिरजगांव येथे अवैध वाळू चोरी व वाहतुकीविरुध्द कारवाई करुन ७ लाख ३० हजार रु. किंमतीचा एक डंपर व तीन ब्रास वाळू जप्त करण्याची कारवाई अहमदनगर एलसीबी टिम’ने केली आहे. कारवाईत बापु सदाशिव खोटे (वय ५५, रा. वाकी, आष्टी, जि. बीड) असे पकडण्यात आलेल्याचे नाव असून, संबंधित एकजण फरार झाला आहे.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे , नगर शहर डिवायएसपी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर एलसीबीचे पोनि अनिल कटके यांच्या सूचनेनुसार एलसीबीचे पोहेकॉ बापुसाहेब फोलाणे, संदीप घोडके, पोना शंकर चौधरी, लक्ष्मण खोकले व पोकॉ कमलेश पाथरुट आदिंच्या ‘टिम’ने ही कारवाई केली आहे.

एसपी राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली ऊ पोनि अनिल कटके यांनी एलसीबीच्या पोलीस अंमलदार यांचे पथक नेमून अवैध वाळू चोरी व वाहतुकीविरुध्द कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते. ‘एलसीबी टिम’ने कर्जत तालुक्यात जाऊन माहिती घेत असतांना माहिती मिळाल्याने बेलगांव ते मिरजगांव रोडने जाऊन मिरजगांव शिवारात अवैधरित्या वाळू चोरी व वाहतूक करणा-या ठिकाणी छापे टाकले. या छाप्यात ७ लाख ३० हजार रुपये किंमतीचा एक लाल रंगाचा डंपर व त्यामध्ये एकूण ३ ब्रास वाळू असा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत दोन आरोपींविरुध्द मिरजगांव पोलीस ठाण्यात भादविक व पर्यावरण कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे