अवैध वाळू उपसा करणा-यांवर धडाकेबाज कारवाई : ५४ लाख ६० हजार रु. मुद्देमाल जप्त, ४ अटक

अवैध वाळू उपसा करणा-यांवर धडाकेबाज कारवाई : ५४ लाख ६० हजार रु. मुद्देमाल जप्त, ४ अटक
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
श्रीरामपूर : अवैध वाळू उपसा करणा-यांवर धडाकेबाज कारवाईत ५४ लाख ६० हजार रु. किंमतीच्या ८ ट्रॅक्टर व १ जेसीबी मुददेमालासह चौघांना जेरबंद करण्यात अपर पोलीस अधीक्षक, कार्यालय श्रीरामपूर व श्रीरामपूर तालुका पोलिस टीमला यश आले. जिल्ह्यात वाळू तस्करी विरोधात श्रीरामपूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.
एसपी राकेश ओला, श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, श्रीरामपूर डिवायएसपी डॉ. बसवराज शिवपुजे, श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्याचे पोनि दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्याचे प्रभारी परि. पोलीस अधीक्षक, प्रभारी
रॉबिन बन्सल, अपर पोलीस अधीक्षक, कार्यालय श्रीरामपूरचे पोहेकॉ शंकर चौधरी, पोना सचिन धनाड, पोना रामेश्वर वेताळ, पोकॉ सुनिल दिघे, तसेच श्रीरामपुर तालुका पोलीस ठाण्याचे पोसई सतिष डौले, पोसई संदिप मुरकुटे, पोहेकॉ प्रशांत रननवरे, पोकॉ/ विनोद कुदनर, होमगार्ड सागर कोळपे, राम मोरे आदींच्या टीमने ही कारवाई केली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अवैध धंद्यांविरुध्द कारवाईचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार दि. ८ एप्रिल २०२५ रोजी रात्री १ वाजण्याच्या सुमारास श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांना माहिती मिळालेल्या माहितीनुसार दि.८ एप्रिल २०२५ रोजी मध्यरात्रीचे सुमारास मातुलठाण शिवार ( ता. श्रीरामपूर) पोलिस टीम गोदावरी नदी पात्रात पहाटे ३.४५ वाजण्याच्या सुमारास मिळालेल्या माहिती प्रमाणे काहीजण हे ट्रॅक्टर व जेसीबीच्या सहाय्याने गोदावरी नदी पात्रात उतरुन जेसीबीच्या साहयाने वाळूचा चोरुन उपसा करून ट्रॅक्टरमध्ये भरत असल्याचे दिसून आले. त्या ठिकाणी पोलिसांनी पंचासमक्ष छापा टाकून नदीपात्रात १ जेसीबी, ८ ट्रॅक्टर ट्रॉलीसह वाळू भरलेले, व दोन दुचाकी वाहने मिळून आली. यावेळी पोलीस पथकाची चाहुल लागल्याने आंधाराचा फायदा घेऊन ट्रॅक्टर व जेसीबी वरील चालक साधने नदीपात्रात सोडून पळून जाऊ लागताच पोलीसांनी त्यातील तीन ट्रॅक्टर वरील चालक व एक जेसीबी चालक असे चौघांना ताब्यात घेऊन त्यांना पोलीस असल्याचे ओळख सांगून विश्वसात घेऊन विचारपुस केली. यावेळी त्यांनी त्यांचे नावे आकाश अभिमन्यु ठोंबरे (वय २०, रा. पुरणगाव ता. वैजापूर), अतीश दत्तू रोठे (वय २०, रा. हिंगोणी ता.वैजापूर), गणेश कैलास पवार (वय२४, रा. लाखगंगा ता. वैजापूर) व एक जेसीबी चालक सुमित धर्मराज ठोंबरे (वय १९, रा. पुरणगाव ता. वैजापूर) असे असल्याचे सांगितले. त्यांच्याकडे व या ठिकाणी मिळून आलेल्या वाहनांने जप्त केली. ५४ लाख ६० हजार रु.किं.चा एकूण मुद्देमाल घटनाठिकाणी मिळून आल्याने पंचनामा करुन साधने व इतरांना ताब्यात घेऊन श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात आणून कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
पोहेकॉ शंकर चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यात गु.र.नं. १९९/२०२५ भारतीय न्याय संहिता कायदा २०२३ चे कलम ३०३(२),३(५) सह पर्यावरण कायदा कलम ३/१५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास श्रीरामपुर तालुका पोलिस ठाण्याचे पोसई. संदीप मुरकुटे हे करत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,300SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!