अवैध धंद्याविरोधात एमआयडीसी पोलिसांची धडक मोहीम ; १० लाखांची देशी-विदेशी व गावठी हातभट्टीची दारु जप्त
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
नगर : पोलिसांनी अवैध धंद्यावर धडक मोहीम राबवली असून हॉटेलवर छापे टाकून १० लाख १ हजार २६० रुपये किंमतीची देशी-विदेशी व गावठी हातभट्टीची दारु जप्त करण्याची कारवाई रविवारी (दि.४ ऑगस्ट) ला एमआयडीसी पोलीसांनी केली आहे.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, नगर ग्रामीण डिवायएसपी संपतराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सपोनि माणिक चौधरी यांच्या सूचनेनुसार पोसई देविदास भालेराव, पोसई विनोद परदेशी, पोसई मनोज मोंढे पोसई विकास जाधव, पोसई आढाव, पोहेकों गणेश कावरे, पोहेकॉ साबीर शेख, पोहेकॉ विशाल थोरात, पोहेकाॅ मुकुंद दुधाळ, पोहेकॉ नंदकिशोरसांगळ, पोहेकाॅ मिसाळ, पोना बोरुडे, पोकाॅ किशोर जाधव, पोकाॅ नवनाथ दहिफळे, पोकाॅ भगवान वंजारी, पोकॉ अक्षय रोहोकले, पोकाॅ ज्ञानेश्वर तांदळे, पोकॉ राजेश राठोड, पोकॉ, सचिन नागरे, पोकॉ सुरज देशमुख, पोकॉ.गोरक्षनाथ केदार आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, रविवारी (दि.४ ऑगस्ट २०२४) ला एमआयडीसी पोलीसांनी विशेष मोहिम राबवून हद्दीतील एमआयडीसी, छत्रपती संभाजीनगरकडे जाणा-या रोडवर, कल्याण रोड, मनमाड रोड, एमआयडीसी परिसरात हॉटेल साईराज, हॉटेल राजयोग, हॉटेल जयविजय, हॉटेल भाउचा धाबा, हॉटेल दोस्ती आणि टपरीचे आडोशाला चोरुन देशी-विदेशी व गावठी दारुची विक्री करणा-यांवर एमआयडीसी पोलीसांनी विविध ठिकाणांवर छापा टाकले. या छाप्यात १० लाख १ हजार २६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत दारु पिऊन गाडी चालविणा-या सात जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.