अल्पवयीन पिडीतेवर अत्याचार करणा-यास 20 वर्षे सक्त मजुरी

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहिल्यानगर ः आरोपी अजय उर्फ विनायक राजेंद्र गर्जे (वय20, रा. खडांबे खुर्द, ता.राहुरी, जि.अहमदनगर) याने अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी विशेष जिल्हा न्यायाधीश, श्रीमती माधुरी एच.मोरे यांनी आरोपीस भादवि कलम 363, 366,376 (3), तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणारा कायदा कलम 4,6,8 व 10 या अन्वये दोषी धरून आरोपीस भादवि कलम 376 (3) नुसार 20 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा तसेच रु.5 हजार रुपये दंड न भरल्यास 3 महिने साधी कैद, भादवि. कलम 366 नुसार 3 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा तसेच दंड रू. 3 हजार रु. दंड न भरल्यास एक महिना साथी कैद अशी शिक्षा ठोठावली. या प्रकरणी सरकारी वकील म्हणून विशेष सरकारी वकील श्रीमती अ‍ॅड. मनिषा पी. केळगंद्रे शिंदे यांनी काम पाहिले.
थोडक्यात हकिकत अशी की, दि.17 डिसेेंबर 2022 रोजी रात्री 9 वा. वय 12 असलेल्या अल्पवयीन पिडीत मुलगी हीस आरोपी अजय उर्फ विनायक राजेंद्र गर्जे व गणेश राजेंद्र चव्हाण यांनी तिच्या आईवडिलांच्या कायदेशीर रखवालीतून चेंडूफळ (ता.वैजापूर,जि.संभाजीनगर) येथे पळवून नेले. त्यानंतर पिडीत मुलीच्या वडिलांनी राहुरी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरूध्द भादंवि कलम 363, 366 नुसार फिर्याद दिली होती. राहुरी पोलीसांनी पिडीत मुलीचा शोध घेऊन, पिडीत मुलगी तसेच आरोपी यांना दि.24 डिसेेंबर 2022 रोजी ताब्यात घेतले. त्यानंतर राहुरी पोलीसांनी पिडीत मुलीचा जबाब नोंदविला. त्यावेळी पिडीत मुलीने सांगितले की, आरोपी अजय उर्फ विनायक गजेेर्र् याने आरोपी गणेश राजेंद्र चव्हाण याच्या मदतीने पिडीत मुलीला दुचाकीवर चेंडूफळ (ता.वैजापूर, जि.संभाजीनगर) येथे पळवून नेले होते. त्यानंतर आरोपी गणेश चव्हाण हा पिडीतेला व अजयला तेथेच सोडून मागे निघून आला. चेंडूफळ येथे एका पडीक खोलीमध्ये आरोपी अजय उर्फ विनायक गर्जेे याने पिडीत मुलीवर बळजबरीने अत्याचार केले, पिडीत मुलीचा जबाब घेतल्यानंतर राहुरी पोलीसांनी आरोपी विरूध्द भादवि कलम 376 तसेच पॉक्सो कायदा कलम 3,4,5,6 नुसार कलम वाढ केली. घटनेचा संपूर्ण तपास पोउपनि चारूदत्त खोंडे यांनी करून न्यायालयात आरोर्पीविरूध्द दोषारोपपत्र दाखल केले.
या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे एकूण 10 साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये अल्पवयीन पिडीत मुलगी तसेच पिडीत मुलीचे वडील, पंच साक्षीदार, तपासी अधिकारी, तसेच वयासंदर्भात ग्रामसेवक, बारागाव नांदूर यांची साक्ष नोंदविण्यात आली. पिडीत मुलीची साक्ष ग्राहय धरली. या केसची सुनावणी चालू असताना सरकारी वकीलांनी युक्तीवाद केला की, पिडीत मुलगी ही घटनेच्या वेळी केवळ 12 वर्षे 2 महिन्याची होती. अशा कमी वयामध्ये घडलेल्या घटनेमुळे बालमनावर अतिशय वाईट परिणाम होत असतो व त्याचे ओरखडे आयुष्यभर त्यांचे मनावर पडतात. आरोपीने अत्यंत वाईट पध्दतीने सदरची घटना केलेली आहे. त्यामुळे आरोपीला जर या केसमध्ये निर्दोष सोडले तर समाजातील वाईट प्रवृत्ती वाढीस लागून लहानग्या अल्पवयीन मुलांवर अशा घटना पुन्हा-पुन्हा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच वय 12 वर्षे 2 महिने असलेली अज्ञान मुलगी ही आरोपी विरुद्ध काहीही कारण नसताना खोटे का सांगेल? त्यामुळे आरोपीस जास्तीत जास्त शिक्षा करण्यात यावी, सरकारी वकीलांचा युक्तीवाद तसेच आलेला संपूर्ण पुरावा ग्राहय धरून न्यायालयाने आरोपीस वरीलप्रमाणे शिक्षा ठोठावली.खटल्याचे कामकाज सरकारी वकील म्हणून विशेष सरकारी वकील श्रीमती अ‍ॅड. मनिषा पी.केळगंद्रे शिंदे यांनी पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी पोकॉ. योगेश वाघ,पोकॉ.इफ्तेकार सय्यद यांनी सहकार्य केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,300SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!