संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online news
संगमनेर – येथील व्यंगचित्रकार अरविंद गाडेकर यांच्या ‘सासू व्हर्सेस सून’ या व्यंगचित्र पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्रातील प्रसिध्द व्यंगचित्रकार चारुहास पंडित,पूणे आणि माजी नगराध्यक्ष सौ.दुर्गाताई तांबे यांच्या हस्ते दि. ३१ जानेवारी, मंगळवारी , सायंकाळी ६ वाजता के .बी.देशमुख (दादा) सभागृह, सह्याद्री काॅलेज, संगमनेर येथे होणार आहे.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी मा.सत्यजित तांबे, डॉ.संतोष खेडलेकर, अनिल देशपांडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पुस्तक प्रकाशन सोहळा होणार आहे. सदर सोहळ्याचे आयोजक संगमनेर साहित्य परिषद आहे.
कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे कार्याध्यक्ष किसन भाऊ हासे आणि सचिव दिलीप उदमले यांनी नागरीकांना केले आहे.
*