संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर – अवैधधंदे बंद न होणे, हे जरी लिखित आहे !. हे जरी खरे असले पण… अहमदनगर जिल्ह्यात जवळजवळ सर्वच पोलिस ठाण्यात अनेक वर्षांपासून यापूर्वीच्या वरिष्ठांना काहींनी खोटी कारणे देऊन देऊन तर, काहींनी खासदार, आमदाराकडे वशिला लावून आजरोजीपर्यंत अपवाद पोलिस कर्मचारी ‘भुंजगा’ प्रमाणे एकाच पोलिस ठाण्यात अनेक वर्षांपासून ठाण मांडून आहेत. त्या पोलिस कर्मचाऱ्यांची अवैध धंद्यावाल्याबरोबर चांगलीच उठबस आहे. यातून मलिदा मिळतोच,पण असो..
एकाच पोलिस ठाणे हद्दीत अनेक प्रकारच्या अवैध धंद्यांना जिल्ह्यात चालना मिळाली आहे. या स्पर्धेतून अवैध धंद्यावाल्यामध्ये मोठी स्पर्धा वाढली. अनेक वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या त्या काही अपवाद पोलिसदादांना हाताशी धरुन एकमेकांच्या धंद्यांवर छापे टाकायला सांगितले जात होते. यामुळे अहमदनगर शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवैध धंद्यावाल्यामध्ये मोठे वाद झाले. पण हे वाद पोलिस ठाण्यापर्यंत गेले नाहीत, त्यामुळे चर्चा थांबली. पण यातून कायदा सुव्यवस्था उदभविण्याची शक्यता आजतरी नाकारता येत नाही.
‘भुजंगा’ प्रमाणे अनेक वर्षांपासून एकाच पोलिस ठाण्यात बसलेल्या त्या ‘पोलिसदादां’ची अवैध धंद्यावाल्याबरोबर चांगलीच उठबस आहे. यात आर्थिक हितसंबंध गुंतलेले असल्यामुळे अनेक अवैध धंद्यांना जिल्ह्यात चालना मिळाली आहे. यामुळेच आज प्रत्येक ठिकाणी युवा पिढी व्यसनाधीन तर होतच आहे. त्याबरोबरच बिंगो सारख्या ऑनलाईन जुगारांच्या आहारी जाऊन बरबाद होत आहे. ही प्रवृत्ती भविष्यात क्राईम वाढण्यास कारणीभूत ठरु नये, हे दुर्लक्षित करून चालणार नाही.
पण नेमकं अनेक वर्षांपासून ठाण मांडून बसलेली त्या पोलिसदादांच्या आशिर्वादाने त्याच समाजघातक अवैध धंद्यांसाठी अनेक परवानग्या देतात, ही एक शोकांतिका आहे. यात असेही घडले आहे की, ही अवैध धंद्यावाले इतकी बेफाम झाली आहे की, एखाद्या पत्रकाराने (वृत्तपत्र, इलेक्ट्रॉनिक, न्यूज वेब, युट्यूब न्यूज चॅनल) अवैध धंद्यांची बातम्या छापल्या अथवा प्रसिद्ध केली की, तो संबंधित अवैधधंद्यावाला त्या संबंधित पत्रकाराला म्हणतो “तू कुठेही जा पोलिस माझं काहीही वाकडे करू शकत नाही”.. या एका वाक्यामुळे पोलिसांची वेशिला टांगली जातेच, त्याबरोबरच आम्हा पत्रकारांची पण..
यामुळे नव्याने आलेल्या जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी प्रथम अनेक वर्षांपासून एकाच पोलिस ठाण्यासह अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेत ठाण मांडून बसलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या आजतरी बदल्या होणे क्रमप्राप्त आहे. तसा बदल्यांचा निर्णय घेतला तर तो अहमदनगर पोलिस प्रशासनाच्या दृष्टीने योग्य असेल, असेही मत पोलिस वर्तुळातून व्यक्त केले जात आहे.