“अतिथी देवो भव” म्हणत विश्वराज शिंदेंकडून बुरुडगांवात आ. संग्रामभैय्या जगताप यांचे स्वागत
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : आमदार संग्रामभैय्या जगताप हे विविध विकास कामाचा शुभारंभ करण्यासाठी रविवारी संध्याकाळी बुरुडगाव येथे आले असता. शिवसेना माजी नगरसेवक स्व.कै.अरूण शिंदे तसेच संजय शिंदे यांच्या घराजवळ अचानक आमदार येतं आहे, हे लक्षात येताच, विश्वराज शिंदे यांनी आ. संग्रामभैय्या जगताप यांचे मोठ्या उत्साहाने स्वागत केले.
यावेळी विश्वराज शिंदे यांनी असे म्हंटले की, “अतिथि देवो भव’ ही आपली संस्कृती आहे. घरी आलेल्या पाहुण्याचे नेहमीच आपुलकीने, माणुसकीने,सन्मानाने आपण स्वागत केले पहिजेत,असे आमचे वडील संजय शिंदे आणि काका स्व.अरूण भाऊ नेहमी म्हणत, त्यांच्या उत्तम संस्काराने आपण घडल्यामुळे आज मी राजकीय पक्षीय ओळख बाजूला ठेवत. आपण बुरुडगावामध्ये विकास कामाच्या निमित्ताने आलेल्या आमदार साहेबांचा सत्कार केला. जगताप कुटुंब आणि शिंदे कुटूंबियांचे अनेक वर्षांपासून राजकारणापलीकडे जुने संबंध आहेत. शिंदे कुटुंबियांना गेल्या ४० वर्षापासून शिवसेनेशी एकनिष्ठ, प्रामणिक म्हणून ओळखले जाते. या पुढेही ती ओळख कायमच राहिलं.आमदार साहेबांनी माझ्या बुरुडगावासाठी जो मोठ्या प्रमाणात भरघोस निधी उपलब्ध करुन दिल्या. शिंदे यांनी त्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त केले. यावेळी शिंदे यांचे सर्व मित्र परिवार तसेच मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ उपस्थित होते.