संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहिल्यानगर ः छ. शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. लढवय्ये हिन्दुधर्मरक्षक,आदर्श राज्य कारभाराची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली होती.युध्दामध्ये शत्रु पक्षाच्या ताब्यात आलेल्या महिलांचा मान-सन्मान साडी-चोळी भेट देऊन परत पाठविले.अशा या संस्कारक्षम, उदात्त विचारसरणीच्या महानायकाच्या जयंतीनिमित्त त्यांच्या महान कार्यास अभिवादन करणे.हे आमचे परमकर्तव्य आहे.असे भावोद्गार अजिंक्य फिटनेस क्लबच्या संचालिका सौ.गायत्री गायकवाड यांनी काढले.
सक्कर चौकातील अजिंक्य फिटनेस क्लबमध्ये व्यायाम व फिटनेससाठी येणार्या सुमारे 100 महिलांनी ’श्री शिवजयंतीचे औचित्य साधुन आगळे वेगळे कार्यक्रमाचे आयोजन केले होते.केशरी फेटा परिधान करून या सर्वजणींनी श्री छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.व छत्रपती शिवाजी महाराज यांची महाआरती केली.यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांचा जयजयकार करत परिसर दणाणून सोडला.
सुरुवातीला सुरेश व अभिजित गायकवाड यांनी उपस्थितांचे स्वागत केले.व महिलांनी शिवजयंतीच्या केलेल्या आयोजनाचे कौतुक केले.
डॉ.निलोफर धानोरकर, डॉ.तेजश्री जुनागडे, डॉ.सौ.प्रज्ञा जोशी, प्रियांका पिसोटे, महिला प्रशिक्षक सुजाता पिल्ले, डॉ मोहिनी येलुलकर, प्राजक्ता पालवे, क्लबचे जी. एम, योगिराज पाडोळे यांनी विचार व्यक्त करत छत्रपती शिवरायांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
प्रथमच महिलांनी केलेल्या शिवजयंतीच्या उपक्रमाचे नियोजन हे गायत्री खुपसे, विणाताई जगताप,राजेश्वरी जाधव,श्रेया पवार,शिल्पा फुलसौंदर,विजया बिचकुले, ज्योती व तन्मयी गाली,शितल राजपुत, प्रिया मुनोत, कृतिका यादव,पलक नागपाल, इशिका कालडा,पायल व पुजा शिंगवी, श्रध्दा शिंदे, राजेंद्र सोनार, एम एच गायकवाड, वैभव दळवी, अँड.संजय झव्हेरी, अजित व अभिमन्यू गायकवाड यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.