अग्निपथ योजना मागे घेतली जाणार नसून सर्व भरती योजनेंतर्गत होणार

👉तरुणांना आपण कोणतेही निदर्शने किंवा तोडफोड केली नाही, असे प्रतिज्ञापत्र द्यावे लागले.
👉पोलिस पडताळणीशिवाय कोणीही सैन्यात भरती होणार नाही.
👉लष्कराचे सरासरी वय 32 वर्षे होते, ते 26 पर्यंत खाली आणण्याचे लक्ष्य

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
नवी दिल्ली –
अग्निवीर होणा-या तरुणांना आपण कोणतेही निदर्शने किंवा तोडफोड केली नाही, असे प्रतिज्ञापत्र द्यावे लागले. पोलिस पडताळणीशिवाय कोणीही सैन्यात भरती होणार नाही. अग्निपथ योजना मागे घेतली जाणार नसून सर्व भरती या योजनेंतर्गत होणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. 25 हजार अग्निवीरांची पहिली तुकडी डिसेंबरमध्ये सैन्यात दाखल होणार आहे, असे केंद्राच्या अग्निपथ योजनेच्या विरोधात देशाच्या अनेक ठिकाणी सुरू असलेल्या निदर्शनेनंतर घेण्यात आलेल्या संरक्षण मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत म्हटले आहे.
यावेळी पत्रकार परिषदेस लष्करी व्यवहार विभागाचे अतिरिक्त सचिव लेफ्टनंट जनरल अनिल पुरी, भारतीय लष्कराचे अ‍ॅडज्युटंट जनरल लेफ्टनंट जनरल बन्सी पोनप्पा, भारतीय नौदलाचे प्रमुख व्हाईस अ‍ॅडमिरल दिनेश त्रिपाठी आणि भारतीय वायू सेनेचे कार्मिक प्रभारी एअर मार्शल सूरज झा हे दिखील उपस्थित होते.


लेफ्टनंट जनरल अनिल पुरी म्हणाले की, कोचिंग इन्स्टिट्यूट चालवणाऱ्यांनी विद्यार्थ्यांना अग्निपथच्या विरोधात आंदोलन करण्यास प्रवृत्त केले. तरुणांनी शारीरिकदृष्ट्या तयार असले पाहिजे, जेणेकरून ते आमच्यासोबत सामील होऊन प्रशिक्षण घेऊ शकतील. या योजनेवर नुकत्याच झालेल्या हिंसाचाराचा आम्हाला अंदाज नव्हता. सशस्त्र दलात शिस्तभंगाला स्थान नाही. कोणत्याही प्रकारच्या जाळपोळ, हिंसेमध्ये सहभागी होणार नाही, हे प्रत्येकाला लेखी द्यावे लागेल.
यादरम्यान, भारतीय नौदलाकडून सांगण्यात आले की, दि.21 नोव्हेंबरपासून पहिली नौदल अग्निवीर तुकडी ओडिशातील INS चिल्का या प्रशिक्षण संस्थेत पोहोचण्यास सुरुवात करेल. यासाठी पुरूष आणि महिला अग्निविरांना परवानगी असेल. भारतीय नौदलात सध्या भारतीय नौदलाच्या विविध जहाजांवर 30 महिला अधिकारी आहेत. अग्निपथ योजनेंतर्गत महिलांचीही भरती करू, असे आम्ही ठरवले आहे. त्यांना युद्धनौकांवरही तैनात केले जाईल.
अनिल पुरी म्हणाले, लष्करातील बदलाची ही प्रक्रिया 1989 पासून सुरू आहे. लष्कराचे सरासरी वय 32 वर्षे होते, ते 26 पर्यंत खाली आणण्याचे आमचे लक्ष्य होते.
यावर दोन वर्षे संशोधन करण्यात आले. तिन्ही लष्करप्रमुख आणि CDS यांनी मिळून जगातील सर्व देशांच्या लष्कराचे सरासरी वय पाहिले. सैन्यात तरुणांची गरज आहे. उत्कटतेबरोबरच जाणीवही हवी.
ज्या दिवशी अग्निपथची घोषणा झाली, त्यादिवशी दोन घोषणा झाल्या, पहिली देशभरात साडेदहा लाख नोकऱ्या आणि सैन्यात अग्निवीरच्या रूपाने 46 हजार जागा, पण लोकांपर्यंत फक्त 46 हजार एवढीच माहिती पोहोचली. कोरोनामुळे वयात बदल करण्यात आला.
पुढील 4-5 वर्षांत आपल्या सैनिकांची संख्या 50-60 हजार होईल आणि नंतर ती 90 हजार ते 1 लाखांपर्यंत वाढेल. आम्ही योजनेचे विश्लेषण करण्यासाठी आणि पायाभूत सुविधांची क्षमता वाढवण्यासाठी 46,000 पासून लहान सुरुवात केली आहे.
घोषणेनंतर होणारे बदल हे कोणत्याही भीतीपोटी नव्हते, परंतु हे सर्व अगोदरच तयार होते.
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
👉CAPF आणि आसाम रायफल्समध्ये अग्निवीरांसाठी 10% आरक्षण.
👉चालू वर्षात अग्निवीरची वयोमर्यादा 21 वरून 23 केली आहे.
👉इंडियन कोस्ट गार्ड, डिफेन्स सिव्हिलियन पोस्टसह डिफेन्स पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगच्या 16 कंपन्यांनाही नियुक्त्यांमध्ये आरक्षण मिळेल.
👉अग्निवीरांना निवृत्तीनंतर स्वस्तात कर्ज आणि त्यांना सरकारी नोकऱ्यांमध्ये प्राधान्य दिले जाईल.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!