👉’चला नदीला जाणूया, या महत्त्वपूर्ण अभियानास तिरंगा आणि कलश देऊन नुकताच सेवाग्राम,वर्धा येथे प्रारंभ
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर– देशातील ‘चला नदीला जाणूया, या महत्त्वपूर्ण अभियानास तिरंगा आणि कलश देऊन नुकताच सेवाग्राम,वर्धा येथे प्रारंभ झाला आहे. यावेळी गोदावरी नदीखोऱ्यातील गोदावरी नदीची उपनदी अगस्ती नदीची जबाबदारी कोपरगाव (जि.अहमदनगर) येथील नदी स्वच्छता, पर्यावरण प्रेमी तथा गोदामाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदिनाथ गो.ढाकणे यांनी नुकतीच स्वीकारली आहे. यावेळी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ञ मेगासेस पुरस्कार विजेते डॉ राजेन्द्रसिंह राणा, ब्रँड अँबेसिडर सिने अभिनेते चिन्मय उदगीरकर, नमामि गोदा अध्यक्ष राजेश पंडित सर, जलबिरारदरीचे महाराष्ट्र अध्यक्ष नरेंद्र चुग हे उपस्थित होते.
स्वातंत्र्याचा 75 वा अमृतमोहोत्सव साजरा करत असताना देशामधील नद्या अमृतवाहिन्या असणे आवश्यक आहे. सध्या सर्व नद्याचे कमी अधिक प्रमाणात आरोग्य धोक्यात आले आहे.ही बाब आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ञ मेगासेस पुरस्कार विजेते डॉ राजेंद्रसिंह राणा यांच्या यांच्या लक्षात आली. त्यानंतर महाराष्ट्र सरकार आणि जलबीरादरी यांच्या संयुक्त विद्यमानाने पहिल्या टप्प्यामध्ये ७५ नद्यांची परिक्रमा म्हणजेच अभ्यास दौरा करून नद्यांचे आरोग्य आणि सध्यस्थिती विषय माहिती गोळा करण्याचा संकल्प केला आहे. २ ऑक्टोबरला गांधी जयंतीचे औचित्य साधून सेवाग्राम,वर्धा येथून या उपक्रमाची तिरंगा आणि कलश देऊन परिक्रमेला सुरवात झालेली आहे.