संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर – अखेर भिंगार भाजपा शहराध्यक्ष शिवाजीराव दहिहंडे यांच्या नेतृत्वाखाली यापूर्वी भिंगार छावणी परिषद कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चास यश आले आहे. त्यावेळी भाजपाच्या शिष्टमंडळालास खा.सुजय विखे पा., यांनी सांगितल्याप्रमाणे नवीन वर्षात भिंगारकरांना १२ रु.क्युबीक दराने पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळेच त्यावेळच्या मोर्चास आता यश आले आहे. ही कार्यवाही प्रक्रिया भिंगार छावणी परिषद व अहमदनगर महानगरपालिका प्रशासनाने लवकरच मार्गी लावल्यास भिंगारकरांना मोठा दिलासा मिळेल, असेही काही सुज्ञ नागरिकांनी ‘संग्राम सत्तेचा’च्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
यापूर्वीच भिंगार परिसरातील नागरिकांना चढ्या भावाने पिण्याचे पाणी कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून दिले जात असल्याच्या निषेधार्थ भिंगार भाजपाचे शहराध्यक्ष शिवाजीराव दहिहंडे यांच्या नेतृत्वाखाली भिंगार छावणी परिषद कार्यालयावर भाजपाचा हांडा मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळेस मोर्चात नगरसेविका शुभांगी साठे, जोत्सनाताई मुंगी, किरण मुळे, अनंत रासने, सुरेश तनापुरे, सचिन फिरोदिया, आनंद बोथरा, कैलास गव्हाणे, अंबादास घडसिंग, नवनाथ मोरे आदिंसह महिलांसह नागरिक सहभागी झाले होते.
या दरम्यान खा.सुजय विखे पा. यांनी भाजपा शहराध्यक्ष शिवाजीराव दहिहंडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला म्हटले होते की, मी तुझ्या लगेच शब्द देत नाही, परंतु अहमदनगर महानगरपालिकेचे केंद्राची अमृत पाणी योजना ज्यावेळेस पूर्ण होईल, त्यावेळेस भिंगार पाणी प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील असेल, असे खा.सुजय विखे.पा.यांनी त्यावेळी सांगितले होते.
भाजपा शहराध्यक्ष शिवाजीराव दहिहंडे यांच्या नेतृत्वाखाली भिंगार छावणी परिषद त्यावेळी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. त्या मोर्चाला यश आले आहे, असेही यावेळी भिंगारच्या सुज्ञ नागरिकांनी म्हटले.