अखेर ऐन येत्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर ‘वडगाव, चिंचपूर पांगुळ’ रस्त्याचे उद्घाटन

👉दर्जेदार रस्त्याचे काम होण्यासाठी नागरिकांची जबाबदारी असणार !
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पाथर्डी-
अखेर जिल्हा परिषदेच्या ऐन निवडणुकीच्या तोंडावर फक्त मतदारांना खुश ठेवण्यासाठी भाजपाच्या नेत्यांच्या माध्यमातून येथील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती सदस्यांकडून जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून ढाकणवाडी-वडगाव-चिंचपूर पांगुळ ते जिल्हा परिषद रस्ता मजबूतीकरण व डांबरीकरणाच्या कामासाठी ३० लाख रुपयांचा अपुरा निधी मंजूर झाला. या कामाचे उद्घाटन शेवगाव -पाथर्डी मतदारसंघाच्या आमदार मोनिकाताई राजळे यांच्या उपस्थितीत खा.डाॅ सुजय विखे पा यांच्या हस्ते झाले.

या रस्ता कामाच्या उद्घाटनानिमित्ताने यावेळी यापूर्वी  झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीनंतर चिंचपूर पांगुळ, वडगाव या डोंगर परिसरात न दिसणारी (गायब) झालेली सदस्य मंडळी येत्या काही दिवसांवर आलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर वडगाव (ता.पाथर्डी) या अपु-या निधीच्या रस्ता कामाच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी आवर्जून उपस्थिती दिसल्याने चिंचपूर पांगुळ, वडगाव परिसरातील नागरिकांच्या चांगल्याच भुवय्या उंचावल्याशिवाय राहिल्या नाहीत. यामुळे या रस्ता कामाच्या उद्घाटनाप्रसंगी परिसरात खा.सुजय विखे पा. व आमदार मोनिकाताई  राजळे यांच्या चर्चेपेक्षा गट व गणातून हारवलेली जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य ऐन येत्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर  विकासकामांच्या उद्घाटन कार्यक्रमात चमकल्याचीच चर्चा नागरिकांमध्ये चांगलीच रंगली आहे.
निमित्त हे अनेक वर्षांपासून चिंचपूर पांगुळला परिसरातील रस्त्याची मोठी दयनीय अवस्था झाली आहे. असे असतानाही या ठिकाणाचा जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य आणि पर्यायाने या शेवगाव पाथर्डी मतदारसंघाचे आमदार ही चिंचपूर पांगुळला परिसरातील समस्या सोडवण्यासाठी फिरकत नव्हत्या. अखेर याला स्थानिक राजकारणही कारणीभूत आहे, असो…
परंतु या चिंचपूर पांगुळ, वडगाव परिसरातील रस्त्याची दयनीय अवस्थाचे ‘नगर रिपोर्टर’ च्या माध्यमातून कायम रस्ता समस्यांचा विषय प्रकाश झोतात आणण्यासाठीचे काम केले गेले. यामुळे या झालेल्या रस्त्याच्या समस्यावर आक्रमक होऊन स्थानिक व तालुक्यातील नेत्यांवर नागरीक संतप्त झाले होते, तशा भावना अनेक नागरिकांनी ‘नगर रिपोर्टर’शी बोलताना व्यक्त केल्या आहेत. या ‘नगर रिपोर्टर’ च्या माध्यमातून नागरिकांनी केलेल्या संतप्त भावनाची दखल घेऊनच, हा अपुरा का होईना! वडगाव येथील रस्त्याला निधी मिळाला आहे. आता हे रस्त्याचे काम दर्जेदार करून घ्याचे स्थानिक नागरिकांवर असणारा आहे. रस्त्याचे काम हे निकृष्ठ होऊ नये, यासाठी स्थानिक नागरिकांनी येता-जाता लक्ष ठेवून वर्षानोवर्षे प्रलंबित असणा-या रस्ताचे दर्जेदार काम करून घेण्यासाठी लक्ष घालवे लागेल !, अशी स्थानिक नागरिकांनी मते मांडली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!